शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पुणे सोलापूर पॅसेंजर मांजरी बुद्रुक येथे थांबवावी अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन करणार__ आप नेते राजेंद्र साळवे__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. हवेली) : मांजरी बुद्रुक येथे पुणे - सोलापूर पॅसेंजर थांबण्यात यावी. यासाठी आपचे राजेंद्र साळवे यांनी रेल्वे मंडल प्रबंधक इंदुमती दुबे यांना निवेदन देण्यात आले. रेल्वे न थांबल्यास बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असे मांजरी बुद्रुक आपचे अध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी सांगितले.

             मांजरी बुद्रुक येथे रेल्वे स्थानकावर पुणे सोलापूर पॅसेंजर जाताना थांबत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत आहे. मांजरी बुद्रुक गावची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास आहे. येथील रेल्वे स्थानकावर प्रवासी संख्या मोठ्‌या प्रमाणात असते. दौंड भिगवन- कुर्डुवाडी- सोलापूर या भागात जाणाऱ्या लोकांची संख्या खूपच आहे. त्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल होत आहे. 

              परंतु रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या कित्येक वर्षाच्या रखडपट्टीमुळे प्रवाशांची संख्या कमी झालेली आहे. यापूर्वी सदर पॅसेंजर या रेल्वे स्थानकात थांबत होती... परंतु वरील पुलाच्या कामामुळे सदरची रेल्वे जाताना या स्थानकात थांबत नाही.. पर्यायाने रिक्षा व्यवसाय सुद्धा थंड पडलेला आहे कोणीच प्रवासी भेटत नाही. या गैरसोयी बाबत वारंवार विनंती केलेली आहे. येथील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित पुणे- सोलापूर पॅसेंजर थांबवण्याची व्यवस्था करावी. 

          अन्यथा असे न झालेस, नाईलाजाने या गंभीर प्रश्नासाठी आपले कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. तरी याची त्वरित दखल घ्यावी ही नम्र विनंतीचे पत्र दिले.

Post a Comment

Previous Post Next Post