शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

माण खटावचे भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात__ गाडी ५० फुट दरीत__


शुभांगी वाघमारे

महाराष्ट्र पोलीस न्यूज
 पुणे : भारतीय जनता पक्षाचे मान खटाव येथील आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात झाला असून अपघातानंतर गाडी सुमारे ५० फूट दरीत कोसळली.

           यामुळे आमदार जयकुमार गोरेसह गाडीत असणारे सर्वच जण जखमी झाले आहेत. पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून यावेळी गोरे व त्यांचे सहकारी पुण्यातून गावी दहीवडीकडे जात होते. काळोखामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. गोरे यांच्यासह गाडीत ४ जण या अपघातात जखमी झाले असून गोरे यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. इतर दोघे जणांवर बरमाती येथे उपचार सुरू आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post