शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

भारताचा बांगलादेशवर तीन विकेट्सनी रोमहर्षक विजय..! अश्विन अय्यर जोडीने सावरला डाव,


 शुभांगी वाघमारे

महाराष्ट्र पोलीस न्यूज


भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळल्या गेला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव केला होता.

         दुसऱ्या कसोटीत काल भारताला विजयासाठी केवळ १०० धावांची आवशयकता होती तर बांगलादेश संघाला भारताचे ६ बळी हवे होते. काळ दिवसअखेर भारतीय संघाने ४ बाद ४५ ही धावसंख्या उभारली होती. यावेळी अक्षर पटेल व जयदेव उनाडकट हे फलंदाजी करत होते. आज 

        २५.ता. सकाळी लढतीला सुरुवात झाल्यानंतर अक्षर पटेल, जयदेव उनाडकट व रिषभ पंत झटपट बाद झाले. त्यामुळे भारताची अवस्था ७ बाद ७४ अशी झाली होती. त्यानंतर श्रेयस अय्यर व आर. आश्विन यांनी डाव सावरला. 



         दोघांनी सातव्या गद्यासाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला विजय मिळवून देताना मालिका २-० निर्विवाद जिंकली. 



         बांगलादेशने पहिल्या डावात २२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ३१४ धावा केल्या. बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात २३१ धावा करू शकला आणि भारतासमोर १४५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चार विकेट्सच्या मोबदल्यात ४५ धावा केल्या होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post