सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : किशोर वयातून तरुण पणात येणाऱ्या शालेय मुलांना व्यसनांचे दुष्परिणाम कसे असतात ते त्यांनी स्वतःचित्रातून रेखाटल्याने ते आयुष्यात दारू, तंबाखू, गुटखा व सिगारेट सारख्या व्यसनांच्या कधी आहारी जाऊन बळी पडणार नाहीत.
नेहरु युवा केंद्र संगठन पुणे युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकारचे उपसंचालक यशवंत मानखेडकर यांनी सांगितले.
अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेच्या वतीने आयोजित बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात व्यसनमुक्ती जनजागृती संदेश चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मानखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. संस्था अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर, मुक्ता पुणतांबेकर, हभप प्रशांतमहाराज मोरे, प्रा. विजय नवले, अशोक मोहिते, डॉ. सीमा इंग्रोळे, शिवराज घुले, उज्वला टिळेकर, अमित घुले, अण्णा धारवाडकर, संदीप लोणकर, डॉ. दादा कोद्रे, विठ्ठल भापकर यावेळी उपस्थित होते.
हडपसर उपनगरांतील सत्तावीस शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांची व शिक्षकांची सुमारे दोन हजार चित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली होती. विविध गटातील विजेत्या स्पर्धकांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व गुलाबाचे रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.
व्यसनमुक्ती जनजागृती संदेश चित्रप्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी तीन दिवस विनामुल्य ठेवले होते. शालेय मुलांनी व पालकांनी हे चित्रप्रदर्शन पाहण्यासाठी विशेष गर्दी केली होती.
अतुल रासकर, राहुल कुदळे, विजय चव्हाण, सुदेश काशिद, ओजस बेल्हेकर यांनी या प्रदर्शनाचे संयोजन केले.

Post a Comment