शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पुणे सोलापूर हायवेवर उरुळी कांचन वाहतूक कोंडीच्या विळख्यात : सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे


 धनंजय काळे

महाराष्ट्र पोलीस न्यूज 


पुणे  (ता. हवेली) : पुणे सोलापूर रोडवर उरुळी कांचन चौकात सोलापूर हायवे जाम झाला. लग्न सराई असल्याने कार्यालया बाहेर वाहने पार्क केल्याने सर्वीस रोड बंद_ परिणाम मेन हायवेवर ट्रॅफिक जाम होत आहे. ट्रॅफिक जाम ही नित्त्याचीच बाब झाल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. 


पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे का? - रस्त्यावर वाहने उभी केल्यामुळे वाहतूक कोंडी -- सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेत्रे 

        हवेली तालुक्यातील ऊरळी कांचन येथील तळवाडी चौक - आश्रमरोड चौकात पोलिस प्रशासनाच्या अभावामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे रोडवरील वाहनांवर कारवाई करावी. उरुळी कांचन हे नेहमी गजबजलेले ठिकाण असते दवाखाने, बाजारपेठ, आश्रम, लग्न कार्यालये छोटे व्यवसाय धारकांच्या वाहने लावली  जातात. 

           उरुळी कांचन येथील दोन्ही चौकात सार्वजनिक वाहतूक करणारी सिक्स लिटर, रिक्षा चौकात आणि भर रस्त्यावर लावली जातात. सर्वीस रोड अडवून वाहने पार्कीग केली जातात. यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी. उरुळी कांचन परिसरातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे.

         या वाहतूक कोंडीतून अॅमबुलन्स ही सुटत नाही. यावर पोलिस प्रशासनाने व्यवस्थित नियोजन केल्यास वाहतूक कोंडीतून उरुळी कांचन मोकळा श्वास घेईल. तसेच रस्त्यावर गाड्या पार्कींग करणार्या नागरिकांनवर कारवाई करावी. अन्यथा सामाजिक कार्यकर्ता उमेश म्हेत्रे व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने ऊरळी कांचन येथे आंदोलन करणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post