शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

बारामती, इंदापूर, दौंड विभागीय बैठक संपन्न : ग्राहक कल्याण फाउंडेशन


 धनंजय काळे

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. दौंड) : ग्राहक कल्याण फाउंडेशन पुणे जिल्हाच्या वतीने पुणे जिल्हा विभागीय बैठक चौफुला बोरमलनाथ मंदीरात आयोजित करण्यात आली होती. 

          कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ग्राहक कल्याण फाउंडेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष नरहरी गांजवे साहेब  उपस्थित होते. 

          या विभागीय बैठकीत बारामती, इंदापूर व दौंड या तीन ही तालुका कार्यकारणी जाहीर करून नियुक्ती पत्र जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आली. बारामती तालुका अध्यक्षपदी सुशीलकुमार अडागळे, उपाध्यक्षपदी मल्लिकार्जुन हिरेमठ, सहसचिव पदी शंतनू साळवे, कोषाध्यक्ष हनुमंत खोमणे, कार्यवाहक श्रीमंत मांढरे, कार्याध्यक्ष प्रमोद शिंदे, संपर्कप्रमुख अजय पिसाळ व प्रसिद्धी प्रमुख माधव झगडे यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

             त्याच बरोबर इंदापूर तालुका अध्यक्ष नंदकुमार गुटाळ, उपाध्यक्ष पोपट डोंगरे, कार्याध्यक्ष अनंता ठवरे, कार्यवाहक राजाराम राऊत, सदस्य प्रकाश वाघमोडे, सदस्य संतोष नरुटे, यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आली. यावेळी  

          दौंड शहर महिला प्रतिनिधी रोहिणी ढवळे यांची नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

          राज्य सदस्य अस्लम तांबोळी, पुणे जिल्हा अध्यक्ष नरहारी गांजवे, उपाध्यक्ष मारूती पठारे, कोषाध्यक्ष पोपट साठे, प्रचार व प्रसिद्ध प्रमुख सुनिल थोरात, पुणे जिल्हा महिला प्रतिनिधी स्मिता बाबरे, अनिता सोनवणे, रुक्साना शेख, यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post