सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल १८९१-- ६ डिसेंबर १९५६) हे भारतीय न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ राजनीतिज्ञ तत्त्वज्ञ आणि समाज समाज सुधारक होते त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली.
आणि अस्पृश्य दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला.
काय लिहू बाबा तुमच्याबद्दल तुम्ही नशीब भविष्य आणि आयुष्य आमचं लिहून गेलात. कापले गेलो तरी सोडणार नाही तुम्हाला हीच तुमच्या लेकरांची वंदना__
बाबा तुमच्या लेखणीने आज अखंड भारत देश घडत आहे बघा बाबा तुमच्या आठवणीने आज आभाळ सुद्धा रडत आहे.
६ डिसेंबर १९५६ ची पहाट उगवली पण सूर्य जणू असताला गेला होता. युगा-युगाचा धगधगता ज्वालामुखी करोडोंचा कैवारी या देशाचा सच्चा देशभक्त या देशाला सोडून गेला. वाऱ्यासारखी बातमी साऱ्या देशभर पसरली दिनांचा वाली आता राहिला नाही त्या दिवशी एकाही घराची चूल पेटवली गेली नाही. जी सापडेल त्यादिवशी जी सापडेल त्या साधनांनी लोकांनी मुंबईला धाव घेतली रेल्वेमध्ये ही पाय ठेवायला जागा नाही. अशा स्थितीतही लोक मुंबईला येत होते प्रत्येक जण रडत होता कोणी माझा बाप गेला तर कोणी माझी आई गेली म्हणून अकरंदन करत होते अरबी समुद्राला जणू काही त्या दिवशी या निळ्या पाखरांच्या अश्रूंचा पूर आला होता चंदनाच्या सुगंधी लाकडावर बाबांचा ध्येय ठेवला गेला बाबांच्या चितेतील एक दिवस ठिणगी ही जणू प्रत्येकाला संदेश देत होती "बाळांनो रडू नका मी हा समतेचा गाडा ईथवर आणला आहे. यापुढे नेता आला तर न्या पण मागे मात्र आणू नका"
👉🏻शिका संघटीत व्हा संघर्ष करा👈🏻
चंदनाच्या चितेवरी देह तुझा निजला पाहायला तुला दिन दुबळा समाज आला
अक्षु हे नयनी दाटूनी आले शब्द मनी तुझे आठवू लागले मायेची सावली प्रेमाचा हात तो निघून गेला त्या एका क्षणात पाहुनी तुला मन व्याकुळ झाले त्या सागराचे ही भान हरपून गेले.
माणसाच्या आक्रोशामध्ये तोही रडत होता. कारण त्या चितेवरी एका प्रज्ञा सूर्यास जळताना तो पहात होता.
महापरिनिर्वाणदिनी महाराष्ट्र पोलीस न्यूज कडून महामानवास विनम्र अभिवादन__
शब्दांकन संपादक - स्मिता बाबरे / कांबळे









Post a Comment