शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
अकोला : गेली अनेक वर्षे भारतीय स्त्री मुक्ती परिषदा यशस्वी करण्याची भारिप बहुजन महासंघाची परंपरा सुरू आहे. १० राज्य परिषदा यशस्वी झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात भारतीय स्त्री मुक्ती दिनाचे आयोजन भारिप बहुजन महासंघामार्फत करण्यात येते.
महाडच्या मनु स्मृती दहनाचे एक दिवस आधी बाबासाहेबांनी महार स्त्रीयांची परिषद महाड येथे घेतली होती. ती देशातील पहीली महार स्त्रीयांची परिषद होती.ती परिषद मनु स्मुती दहना पुर्वी झाली तो काही योगायोग नव्हता, बाबासाहेबांनी जाणीव होती की सामाजिक व धार्मीक लढ्या सोबतच दलीत बहुजनातील स्त्रीयांच्या स्त्री मुक्ती चा लढा उभा करणे ही काळाची गरज आहे.
गुजरात मध्ये २५ डिसेंबरला दरवर्षी मनु स्मुर्ती दहनाच्या अनुषंगाने भारतीय स्त्री मुक्ती दिनाचे मोठे कार्यक्रम होतात. तसेच भारतीय स्त्री मुक्ती परिषदा ह्या आंध्र, तामीळनाडु मध्येही होतात. हे यश भारिप बहुजन महासंघाने सुरु केलेल्या भारतीय स्त्री मुक्ती परिषदांचे आहे.
या परिषदेत ठराव मांडत असतांना आपण तळागाळातील शेवटच्या माणसाचा विचार झाला पाहीजे याची काळजी घेतो.दलीत, बहुजन स्त्रीला आपला विकास कसा होतो, त्यांचा या देशातील घडामोडीतील दृष्टिकोन लोकांसमोर मांडला जावा हाच भारिप बहुजन महासंघाचा अजेंडा असतो तोच या ठरावातुन पुढे आला पाहीजे हा ठरावाचा मुळ उद्देश असतो.
राजकीय पक्षाची दोन महत्वाची कार्य असतात एक तर निवडणुका लढविणे आणि प्रशासन चालविणे. निवडणुकीतुन सत्ता मिळविणे व समुहाच्या हितासाठी धोरण आखणे व त्याची अंमलबजावणी करणे.जनतेचा विकास करणे आणि जनतेचे त्या अंगाने प्रबोधन करणे हा असतो.
भारिप बहुजन महासंघामुळे अनेक प्रस्थीपित राजकारण्यांचे राजकारण धोक्यात आले आहे. शोषित, वंचीत समुह सत्ताधारी होने ही त्याच्या साठी प्रचंड मोठी अडचण आहे.
बाबासाहेबांनी लोकशाहीतुन आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्या बाबत सर्व सामान्य नागरिका सोबतच पदाधिकारी कार्यैकर्त्यांनी सजग असले पाहीजे. मतदार नोंदणी पासुन मतदान यादी आणि प्रत्यक्ष मते मत पेटी पर्यंत घेउन जाण्या पर्यंत आपले दक्ष असलो पाहीजे. येणा-या काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत संपुर्ण यश आपण मिळवु शकु असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. त्यात आपण सर्व यशस्वी होवु असा विश्व्वास व्यक्त करुन आपणा सर्वांना भारतीय स्त्री मुक्ती दिनाच्या शुभेच्छा देतो असे प्रकाश आंबेडकर यांनी मत मांडले.




Post a Comment