शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

स्मिता गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध शासकीय योजनांचे आयोजन__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे हडपसर : १२ डिसेंबर रोजी भाजपा ओबीसी आघाडी उपाध्यक्ष स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे "शासकीय योजना शिबिर" राबविण्यात आले. २ दिवस हे शिबीर राबविण्यात आले.



          यावेळी आधार कार्ड संबंधित सेवा...नवीन आधार कार्ड, जन्मतारीख दुरुस्ती, पत्ता दुरुस्ती, नावातील दुरुस्ती, मोबाईल नंबर लिंक करणे, आधार अपडेट सेवा देण्यात आल्या. तसेच दहा वर्षाखालील मुलींसाठी  सुकन्या समृद्धी योजना, भारतीय डाक विभागातर्फे रु. ३९९/-ची पॉलिसी, प्रधानमंत्री जनधन योजना असे विविध शासकीय योजना या शिबिरात राबविण्यात आल्या. हडपसर परिसरातील नागरिकांनी या ' शासकीय  योजना शिबिरास ' उत्तम प्रतिसाद दिला.



            शिबीर हे मा. आमदार योगेश आण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मा. नगरसेविका श्रीमती रंजनाताई (नानी) टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. योगेश टिळेकर यांच्या सुविद्य पत्नी संध्याताई टिळेकर, भाजप पुणे शहर सरचिटणीस संदीप लोणकर, भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश पिंगळे, पुणे शहर उपाध्यक्ष भूषण तुपे, मा. नगरसेवक मारुती (आबा) तुपे, उज्वलाताई जंगले, हडपसर मतदारसंघ अध्यक्ष संदीप दळवी, संघटन सरचिटणीस गणेश घुले, हडपसर विधानसभा महिला आघाडी अध्यक्षा स्वाती कुरणे, सरस्वती शेंडगे, विजया ताई वाडकर, जीवन (बापू ) जाधव, सागर बारदोसकर, देविदास बिनावडे, दिपक भाऊ जगताप, जयश्री बिडकर, शोभाताई लगड, शिल्पा ताई होले, सीमाताई शेंडे, छाया ताई गदादे, स्मिताताई लडकत, अभिजीत बोराटे, सतीश भिसे, युवराज मोहरे, भगतसिंग कल्याणी, बाळासाहेब हरपळे, बाळासाहेब घुले, वसंत वाघमारे, नानासाहेब हडदरे, राकेश वाघमारे, निखिल शिंदे, संकेत गदादे, काशिनाथ शिरसाट, महेश ससाणे, नितीन ससाणे, विजय नायर, मच्छिंद्र वाडकर, परशुराम घनवट, शुभम बोरावके, जावेद मुलानी, रौफ शेख, अण्णासाहेब बांदल, महेंद्र बनकर, धर्मेंद्र इंगळे, अमोल भोंगळे, काशिनाथ भुजबळ, बनकर सर, होले सर, श्याम ओगले, नूतन झांबरे, संगीता पाटील, मोहिनी शिंदे, निकिता निंगाले, विजया भूमकर, मार्टिना बारदोस्तकर, मीनाताई पिंटो, शीला भास्करकट्टी, सुनीता रायकर,सुनीता पाटील, रुपाली पाटील, आरती कांबळे, भावना कांबळे, सुजाता गायकवाड इ. भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते व स्मितसेवा फौंडेशन सदस्य उपस्थित होते. 

          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश बेल्हेकर यांनी तर आभार प्रदर्शन तुषार गायकवाड यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post