शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

इंडियन डेंटल असोसिएशन हडपसरच्या वतीने सासवड वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिकांची तपासणी__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (हडपसर) : इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर शाखेच्या वतीने सासवड येथील माया केअर सेंटर वृद्धाश्रम मध्ये जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य, दंत तपासणी व ओरल कँसर स्क्रिनिंग शिबीर आयोजित करण्यात आले होते.

          याप्रसंगी हडपसर डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आनंद भनसाळी, डॉ. प्रतीक राऊत, डॉ.रोहित गांधी, माजी अध्यक्ष डॉ.जयदीप फरांदे, डॉ.अनिकेत कुगावकर, डॉ.अपूर्वा लोढा डॉ.तृप्ती घोलप, माया केअर सेंटर चे डॉ.संजीव भाटे, डॉ.वैष्णवी भाटे आदी यावेळी उपस्थित होते.



              यावेळी सहभागी जेष्ठ नागरिकांना टूथब्रश टूथपेस्ट व किराणा साहित्य इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने वितरित करण्यात आले.

           इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात सासवड येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी दंत तपासणी व कॅन्सर स्क्रीनिंग शिबीर आयोजित केले याचा लाभ जेष्ठ नागरिकांनी घेतला अशी माहिती आयोजक इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर चे अध्यक्ष डॉ आनंद भनसाळी यांनी दिली.

           कर्करोग प्रमाण वाढत चालले आहे त्याची लक्षणे दिसत नाहीत अत्याधुनिक मशीन द्वारे तपासणी यंत्रणा भारतात सुरु झाली आहे, या शिबिरात जेष्ठ नागरिकांची मोफत तपासणी केली ही तपासणी सर्वांनी करावी जेणेकरून वेळेवर कर्करोगावर उपचार करता येतील अशी माहिती डॉ.तृप्ती घोलप यांनी दिली.

           इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने मोफत शिबीर व किट वाटप केले. माया केअर वृद्धाश्रमाचे संचालक संजीव भाटे यांनी आभार मानले. शिबिराचे संयोजन डॉ.अनिकेत कुगावकर, डॉ.अपूर्वा लोढा यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post