शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सरकारी धान्याचा काळाबाजार करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. दौंड) : काळाबाजार करणारी टोळी जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश__ (दि. ०३) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. हवा. घाडगे यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की यवत पोस्ट हद्दीत बेकायदेशीरपणे रेशनच्या धान्याची घोटाळा करून चोरून वाहतूक व विक्री केली जात आहे. 

          अशी गोपनीय माहिती मिळालेने सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांचे सूचनेप्रमाणे पुरवठा अधिकारी दौंड यांना पत्राद्वारे सदर कारवाईस हजर राहण्यासाठी कळवले असता पुरवठा अधिकारी हजर राहिल्याने या घटनेची यवत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी बातमीचा तपशील सांगून (दि. ४) रोजी पहाटे ०४:०० वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच यवत पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी व पंच असे यवत पोलीस स्टेशन हद्दीत कासुर्डी टोलनाका येथे जाऊन सापळा रचला. 

           पुणे बाजू कडून येणारे दोन पांढरे रंगाचे टाटा २०७ मालवाहतूक टेम्पो MH 12 GT 0336 व MH 12 QG 3497 तसेच एक अशोक लेलँड कंपनीचा पांढरी रंगाचा बडा दोस्त MH 12 SX 2001 या वाहनांना स्टाफच्या मदतीने थांबवून त्यावरील चालकांना खाली उतरवून त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांची नावे अनुक्रमे १) मुकेश नरसिंगराव माधव (वय  21 वर्षे) रा. बिबेवाडी वोटा नं 109, सुहाग मंगल कार्यालयता, हवेली, जि. पुणे,२) भाऊसाहेब अर्जुन कुटे वय 37, रा. नाईस प्लॉट,ज्ञकॅनॉल जवळ चारभुजा सायकल मार्ट चे पाठीमागे, गुलटेकडी ता. हवेली, जि. पुणे, ३)सादिक इलाहीबक्ष अलबेलकर (वय 55 वर्षे) रा. काशीवाडी भवानी पेठ ता. हवेली, जिल्हा पुणे असे सांगितले.

          त्यानंतर त्यांना पंचा समक्ष त्यांचे ताब्यात असणाऱ्या वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता त्यांनी वाहनांमध्ये गहू, तांदूळ, हरभरा असल्याचे सांगितले. त्यानंतर लागलीच त्यांना आम्ही सदर मालाची पावती अगर इतर कागदपत्रे दाखवण्यासाठी लेखी नोटीस दिली. असता त्यावर त्यांनी मालाची कसलीही बिलाची पावती नाही असे सांगितले तसेच आरोपी क्र.१ याचे कडे अधिक विचारपूस केली असता सदरचा माल जावेद लालू शेख राहणार काशीवाडी पुणे यांचा असल्याचे सांगितले. आरोपी क्र. २ याचे कडे अधिक विचारपूस केली असता त्याचे कडे मिळून आलेला माल हा कासिम शेख व अमोल कंधारे दोघे राहणार काशेवाडी पुणे यांचा असल्याचे सांगितले. तसेच आरोपी क्रमांक ३ याने माल हा अब्बास अब्दुल सरकारवर राहणार काशीवाडी पुणे याचा असल्याबाबत सांगितले.

       तिघांनीही सदरचा माल हे ते केडगाव मधील दुकानदार किशोर होळकर राहणार केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे. यांचेकडे घेऊन निघाले असल्याबाबत सांगितले. 

          त्यामुळे प्रथमदर्शनी सदरचे धान्य हे रेशनिंगचे असले ची आमची खात्री झाली या मालाची पंचा समक्ष पाहणी केली असता तिन्ही वाहनांमध्ये एकूण 

1) 10800 कि. रेशनिंग चे तांदूळ

2) 300.  किलो रेशनिंग चे गहू

3) 25  किलो रेशनिंगचा हरबरा

        असे धान्याची व वापरलेल्या वाहनांची एकूण किंमत 12,73,250/- रू चा माल आरोपींकडून पंचा समक्ष जप्त करण्यात आला. 

           सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक सो अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पो उप निरीक्षक शिवाजी ननवरे, पो.हवा. सचिन घाडगे, पो. हवा. असिफ शेख, पो ह. वा. अजित भुजबळ, पो. हवा. विजय कांचन, पो. हवा. अजय घुले, पो. कॉ. धिरज जाधव यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post