शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

प्रजासत्ताक दिनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना __बारामती  


 सुशीलकुमार अडागळे

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. बारामती) : भारतीय प्रजासत्ताकाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त बारामती येथील रेल्वे मैदानावर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. तत्पूर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या संचलन पथकाचे निरीक्षण केले. पथकात शहर पोलीस, राष्ट्रीय छात्र सेना, नागरी संरक्षण दल, रस्ता सुरक्षा पथक, अग्निशमन दल, यांचा समावेश होता.



          यानंतर सर्व पथकांनी  संचालनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. तहसिलदार विजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, शहर पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, उपअधिक्षक भूमी अभिलेख गणेश कराड, निवासी नायब तहसिलदार विलास करे, विविध विभागाचे शासकीय अधिकारी, पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्य सैनिकांचे उत्ताराधिकारी, शहरातील मान्यवर व नागरीक उपस्थित होते.



         प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

         शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची सांगता झाली. प्रशासकीय भवन येथील प्रांगणात  तहसिलदार विजय पाटील यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, उप अधिक्षक भूमी अभिलेख गणेश कराड, तहसील कार्यालय व प्रशासकीय भवनातील  विविध विभागाचे  अधिकारी कर्मचारी, नागरिक आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post