शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पुन्हा__बीसीसीआयच्या अध्यक्षपदी चेतन शर्मा यांची निवड__


 सचिन दोरकर

महाराष्ट्र पोलीस न्यूज



मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा चेतन शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नव्या निवड समितीची घोषणा केली आहे.

निवड समितीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय पुरुष संघाच्या निवड समितीची घोषणा केली आहे. क्रिकेट सल्लागार समितीने अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या सदस्यांची निवड केली आहे. 

            या सल्लागार समितीत सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांचा समावेश आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला इंग्लंडकडून मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. 

           त्यानंतर बीसीसीआयने कठोर पावले उचलली होती. बीसीआयने मोठा निर्णय घेत चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती बरखास्त केली होती. 

          चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समिती बरखास्त करून नवीन निवड समितीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानंतर आता नव्या निवड समितीची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्यावर विश्वास टाकत त्यांची अध्यक्षपदी निवड केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post