सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे हडपसर : मांजरी बुद्रुक भापकर मळा येथील भव्य स्वामीं समर्थ मंदिराचा २०१४ साली विठ्ठल नामदेव भापकर यांच्या संकल्पनेतून व जगद्गुरू शंकराचार्य महाराज (कोल्हापूर), सुदाम गोरखे महाराज (कर्जत), आदेश गिरी महाराज (पुरंदर) यांच्या हस्ते मुर्ती प्रतिष्ठापणा, पादुका व मंदिराचे कलश पुजन करण्यात आला. मंदिराचे संपूर्ण बांधकाम विठ्ठल भापकर यांनी स्वखर्चाने करून मांजरी बुद्रुक परिसरातील नागरिकांसाठी पवित्र स्थळाची निर्मिती केली. स्वामी मंदिर स्थापनेपासून नित्यनेमाने पोर्णिमा, दत्त जयंती, गुरु पोर्णिमेला पुजा, व महाप्रसाद केला जातो. महाप्रसाद हा लोक वर्गणीतून भाविकांना दिला जातो.
गुरुचरित्र पारायण पठण
याच अनुषंगाने सालाबादप्रमाणे दिप प्रज्वलन ह. भ. प. प्रदिपदाद सोनवणे स्वामी समर्थ मठ संगमनेर यांच्या हस्ते करण्यात आले. १६ तारखेपासून गुरु चरित्र पारायणाच्या वाचनाने या उत्साहाला सुरवात झाली. स्वामी प्रगट दिनाच्या पहाटे रुद्र अभिषेक, काकड आरती, सकाळी आठ वाजता स्वामी याग, दत्त याग, नवचंडी यज्ञ, आरती, स्वामींचा अभिषेक ५१ जोडप्यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर स्वामींच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज हभप प्रशांत महाराज मोरे यांच्या किर्तनाचा लाभ भावीकांना झाला. यानंतर लोक वर्गणीतून आलेल्या शिधाचा महाप्रसाद करण्यात आला. दर्शन व महाप्रसादासाठी हजारोच्या संख्येने नागरिकांनी तोबा गर्दी केली.
यावेळी पोलीस बंदोबस्त कुठेही दिसला नाही. दर्शन रांगेची पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला कोण दर्शन रांगेची व्यवस्थ कोण करत आहे हे समत नव्हते. अपवाद वगळता कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला. यावेळी मांजराई देवी प्रासादिक दिंडी व विठ्ठल आण्णा भापकर मित्र परिवार यांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यासाठी विठ्ठल भापकर, निलेश भाले (गुरुजी), गणेश भापकर, विशाल भापकर, दिपक जाधव, सागर उनवणे, माजी उपसरपंच मांजरी बुद्रुक कैलास घुले, दत्ता सोनवणे, विलास घुले, रामभाऊ साळुंके, संपत भापकर, साहेबराव भापकर, शंकर आबा घुले, राऊत यांनी परिश्रम घेतले.





Post a Comment