सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे हडपसर : पुण्यातील मुळा मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. महानगरपालिकेच्या वतीने स्पायडर मशीनने खासगी ठेकेदाराला जलपर्णी काढण्याचे काम दिले होते , परंतु बऱ्याच ठिकाणची जलपर्णी काढणे बाकी आहे तसेच विविध भागातून येणाऱ्या सांडपाण्यामुळे जलपर्णी वाढली असून ही जलपर्णी आता मुंढवा जॅकवेल मधून बेबी कॅनॉल मध्ये येत असून त्यामुळे बेबी कॅनॉल मध्ये सर्वत्र जलपर्णी ची हिरवी चादर तयार झाली असून त्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या संख्येने झाली असून नागरिक या डासांच्या मुळे हैराण झाले आहेत, अनेक नागरिकांना डेंग्यू , मलेरिया सारखे आजार झाले असून नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,
याबाबत मांजरी, शेवाळेवाडी, साडेसतरा नळी, विठ्ठलनगर, फुरसुंगी परिसरातील बेबी कॅनॉल मधील वाढलेली जलपर्णी तातडीने काढावी व डासांचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी औषध फवारणी करावी तसेच डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करावीत यासाठी पुणे महानगर पालिकेच्या संबधित अधिकाऱ्यांना आपणाकडून योग्य आदेश व्हावेत असे निवेदन पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे केले.

Post a Comment