सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे हडपसर : मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी परिसरातील विठ्ठलभक्तांना माऊलींच्या दर्शनासाठी आता बस बदलत जाण्याची गरज नाही. भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या प्रयत्नातून शेवाळेवाडी ते आळंदी देवाची बस सेवा करण्यात आली.
शेवाळेवाडी ते आळंदी देवाची पीएमपीएल बससेवेचा शुभारंभ माजी सरपंच पंढरीनाथ शेवाळे, हभप रामदादा शेवाळे, हभप पांडुरंग शेवाळे, पीएमपीलचे सुरेंद्र दांगट यांच्या हस्ते व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाला.
या वेळी हभप शांताराम शेवाळे, वसंत शेवाळे, सुनील शेवाळे, चंद्रकांत शेवाळे, दीपक शेवाळे, संजय कोद्रे, विजय कोद्रे, संभाजी हाके, माजी सरपंच प्रतिमा शेवाळे, वैशाली हरपले, रसिका कुंभारकर, दिगंबर शेवाळे, कैलाश जैस्वाल, राम खेडेकर, रमेश कोद्रे, विजय शेवाळे, जयप्रकाश शहा, शिवाजी चंद व भाविक उपस्थित होते. राहुल शेवाळे आणि मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते आगारप्रमुख आणि वाहक-चालक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बसेसना हारफुले, झेंडे यांनी सजवून विठुरायाच्या नामाचा टाळ-मृदंग यांच्या तालावर गजर करत ग्रामस्थ आणि वारकरी मंडळींनी गावातून मिरवणूक काढली. शेवाळेवाडी बस डेपोच्या वतीने राहुल शेवाळे आणि माजी सरपंच प्रतिमा शेवाळे आणि मान्यवर ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. टाळ-मृदंगाचा गजरात बस माऊली (देवाच्या आळंदी) कडे प्रस्थान झाली.





Post a Comment