सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
👉🏻क्रिकेटच्या सामन्यात विद्यार्थी संघ विजयी
मांजरी बुद्रुक प्रतिनिधी
पुणे हडपसर : मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब मगर महाविद्यालयात क्रिकेटचा मैत्री चषक २०२३ चे आयोजन करण्यात आले. अण्णासाहेब मगर महाविद्यालयात एएमएम स्पोर्ट कार्निवल अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थी संघ व हडपसर पोलीस स्टेशनचा पोलीस क्रिकेट संघ यांच्यात क्रिकेट मैत्री चषक सामना रंगला. या सामन्यात अण्णासाहेब मगर महाविद्यालय क्रिकेट संघाने विजय मिळविला. सामन्याचे बक्षीस वितरण हडपसर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या हस्ते व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे अध्यक्षस्थान भूषविले. या प्रसंगी "खेळामुळे ताणतणाव व्यवस्थापण, संघ भावना, खिलाडू वृत्ती वाढीस लागणे, फिटनेस, व्यायामाची गरज लक्षात येते. कामामुळे पोलिसांवर येणाऱ्या ताणावर खेळ हे एकमेव रामबाण औषध आहे." असे प्रतिपादन हडपसर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी केले. नाणेफेक जिंकून अण्णासाहेब मगर कॉलेज संघाने क्षेत्ररक्षण स्विकारले हडपसर पोलीस स्टेशन संघाने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांमध्ये ६६ धावांचे आव्हान उभे केले. अण्णासाहेब मगर महाविद्यालय संघाने ६ षटक ४ चेंडूमध्ये ७१ धावा काढून हे आव्हान मोडीत काढत चार विकेट राखून पोलीस स्टेशन संघाचा पराभव केला. हडपसर पोलीस स्टेशन संघातील उमेश शेलार यांनी उत्कृष्ट गोलंदाज, संदीप जोगदंड यांनी उत्कृष्ट फलंदाज, पिसाळ यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, पोलीस कर्मचारी संघाचे संघनायक सहायक पोलीस निरीक्षक दिनेश शिंदे यांनी उत्कृष्ट कप्तान व अण्णासाहेब मगर कॉलेजच्या स्वप्नील सोनवणे याने मेन ऑफ दी मॅचचा' किताब प्राप्त केला.
प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी संघातील खेळाडूंची मुलाखत घेऊन खेळाचे पोलिसांच्या जीवनातील स्थान त्यांच्याकडून जाणून घेतले. कायदा व सुव्यवस्था सांभाळताना स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष देणे महत्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. प्रितम ओव्हाळ यांनी केले तर सामन्याची बहारदार कॉमेन्ट्री राजकुमार काटे याने करून सामना प्रेक्षणीय केला. सामन्याच्या आयोजनात अमोल गायकवाड, श्रीकृष्ण थेटे, धीरज सोनवणे, राजेंद्र औटे, विशाल कोलते, स्वप्नील सोनवने, अमन शेख, भारती घाडगे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमा प्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औंटी, प्रा. अनिल जगताप, प्रा. नितीन लगड, प्रा. अनिता गाडेकर, डॉ. वंदना सोनवले उपस्थित होते.


Post a Comment