शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कवडीपाट टोलनाक्याजवळ एका ४० वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या : कदमवाकवस्ती


 सुनिल थोरात 

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (हवेली) :पुणे सोलापूर महामार्गावरील पुर्व हवेलीतील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत कवडीपाट टोलनाका (सुर्या पार्क) येथे असलेल्या रिकाम्या खोलीत एका ४० वर्षीय व्यक्तीने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

             मंगळवारी (ता. १८) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या आसपास हि घटना उघकीस आली आहे. महादेव किशन भांगे (वय - ४०, धंदा चहा विक्री मूळ रा. लातूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर व्यक्तीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नसून घटनास्थळी लोणी काळभोर पोलीस दाखल झाले आहेत.

            माहितीनुसार, कवडीपाट परिसरातील टोलनाका येथे असलेल्या कार्यालयात एकाने आत्महत्या केल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, प्रमोद हंबीर, अजिंक्य जोजारे व तेज भोसले हे सदर ठिकाणी पोहोचले व त्यांनी पाहणी करून मृतदेह नागरिकांच्या मदतीने खाली घेतला.

           दरम्यान, सदर भांगे यांनी मागील दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून मृत भांगे याला मोठ्या प्रमाणात दारू पिण्याचे व्यसन असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. सदर ठिकाणी पंचनामा सुरु असून आत्महत्या का केली याचा तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post