सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे, हवेली : पुणे शहरातून संतापजनक घटना उघडकीस आली आहे. नोकरी शोधून देण्याच्या व लग्न करण्याच्या आमिषाने एका 30 वर्षीय विवाहीत महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीला फोटो दाखविण्याची तसेच मुलांना जीवे मारण्याच्या धमकीतून नराधामाने हे कृत्य केले आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी कोंढव्यातील ३० वर्षीय महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून सचिन विलास कदम (वय ३५, - रा. एस.के. ग्रुप, अंबामाता चौक, सुखसागरनगर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार २९ डिसेंबर २०२० ते ६ एप्रिल २०२३ दरम्यान हांडेवाडी चौकातील गोकुळ लॉज, सासवड रोडवरील बोपदेव घाटातील सह्ययाद्री लॉजमध्ये घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार...!
आरोपी कदम व पिडीत महिला हे ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी कदम याने महिलेस नोकरी शोधून देईल व लग्न करेल असे सुरुवातीला आमिष दाखविले. त्यातून त्याने पिडीत विवाहीतेवर तिच्या मनाविरुद्ध जबरदस्ती करत अनैसर्गिक पध्दतीने शारीरिक संबंध व मारहाण केली. एवढ्यावर न थांबता वेळोवेळी पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी आरोपी देत होता तसेच फोटो दाखवितो असे म्हणत होता. या भितीतून पिडीतेने पोलिसात तक्रार केली नाही. मात्र आरोपीकडून महिलेला वारंवार त्रास दिला जात असल्यामुळे अखेर पिडीत महिलेने पोलीसात धाव घेतली व तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment