सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : दि.२५ रोजी १४:३० ते १६:०० दरम्यान शिकापूर पोलीस स्टेशन हदितील 'यामाझाकी मझाक कंपनी, सणसवाडी येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये पुणे - अहमदनगर रोडवरील शिकापूर- रांजणगांव- शिरूर पो स्टे हद्दी मध्ये असणारे औद्योगीक वसाहतीमध्ये असणा-या कंपनीच्या प्रमुख व जबाबदार पदाधिकारी यांची बैठक घेतली होती.
सदर बैठकीस मा. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी मार्गदर्शन करित कंपनीचे व्यवस्थापन करित असताना येणा-या अडचणी विशेषत: पोलीस प्रशासनाशी निगडीत असलेल्या अडचण कळविण्याबाबत जाहीर आवाहन केले होते.
या प्रकरणी विविध कंपनीच्या पदाधिकारी यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये डयुटीचे वेळी येताना - जाताना वाहतुकीचे नियोजना सोबतच अन्य अडचणीं बाबत समोरासमोर चर्चा केली.
अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी बैठकीस उपस्थित सर्व जबाबदार पदाधिकारी यांना सांगीतले की, " Safe and fearless environment for industries' असे पुणे ग्रामीण पोलीसांचे औद्योगिक क्षेत्राबाबत धोरण आहे. औदयोगीक परिसरामध्ये काम करित असताना कोणत्याही दबावाला बळी न पडता तात्काळ पोलीसांशी संपर्क साधण्याबाबत असून उद्योजकांचे पोलीस प्रशासना संदर्भात असलेल्या अडअडणी समजावून घेवून त्यांचेमागे पोलीस प्रशासन कायम खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.
कायदेशीर बाबींसाठी कोणत्याही वेळी पोलीस प्रशासन तत्पर असल्याबाबत आधार दिला आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणत्याही कंपन्यांना बेकायदेशीररित्या जर कोणी माथाडी, लेबर कॉन्ट्रक्टर, स्क्रॅप कॉन्ट्रक्टर, पाणी सप्लायर, कॅन्टीन कॉन्ट्रक्टर, ट्रान्सपोर्ट वगैरे प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी किंवा इतर कारणास्तव त्यात प्रामुख्याने खंडणीसाठी कोणास धमकावणे, गुंडगिरी करणे, त्याचबरोबर कोणत्याही बेकायदेशीर व राजकीय दबावाला बळी न पडता संबंधीत पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी तक्रारीवर पोलीस तात्काळ भुमीका घेतील याबाबत आश्वासित केले.
तसेच पोलीस प्रशासन औद्योगिकांकरिता कोणत्याही वेळी उपलब्ध असल्याचे कळविले आहे.
औद्योगीक क्षेत्रामधील वाहतुकीच्या समस्येवर उपाययोजना करण्याचे अनुषंगाने चर्चा करताना सांगितले की, पोलीस अंमलदारांची अपु-या संख्याबळामुळे " औद्योगिक क्षेत्रामध्ये डिसीसीआय व रिया यांचे संयुक्त विद्यमाने वाहतुक नियमन करणारे वार्डन उपलब्ध करून दिले तर संबंधित क्षेत्रामध्ये संबंधित पोलीस स्टेशन कडील वाहतुक पोलीस मदतीला देवून कंपनीमध्ये जाताना - येतानाचे वेळेत वाहतुक कोंडी होणार नाही याबाबत कार्यवाही करण्याबाबत आश्वासीत केले आहे.
सदर बैठकीस शिकापूर, रांजणगांव, शिरूर औद्योगिक विभागतील विविध कंपन्याचे सुमारे १०० ते ११० उदयोजक व त्यांचे प्रतिनीधी हजर होते. तसेच पोलीस प्रशासनाचे वतीने यशवंत गवारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरूर विभाग, प्रमोद क्षिरसागर, पोलीस निरीक्षक, शिकापूर पो.स्टे., बलवंत मांडगे, पोलीस निरीक्षक, रांजणगांव पो.स्टे. उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास साळवी (एच. आर. मॅनेजर यामाझाकी, मझाक) यांनी केले व सपोनि वैभव स्वामी यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Post a Comment