सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे हडपसर : जनसामान्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी अथक पाठपुरावा करून जुन्या कॅनॉलमधील जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरवात केली असल्याची माहिती भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुलदादा शेवाळे यांनी कामठे वस्ती शेवाळेवाडी येथे बोलताना दिली.
साडेसतरा नळी, १५ नं, विठ्ठल नगर , मांजरी , लक्ष्मी कॉलनी, शेवाळेवाडी, फुरसुंगी भागातुन जाणाऱ्या जुन्या कॅनॉलमधील वाढलेल्या जलपर्णीमुळे डासांचे प्रमाण भयानक वाढून डेंगू,मलेरिया, चिकण गुनिया या आजारांनी नागरिक त्रस्त झाले होते.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री राहुलदादा शेवाळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत व मनपा आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन जलपर्णी काढण्याची मागणी केली होती, याबाबत योग्य ते निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस आणि आरोग्यमंत्री सावंत यांनी पुणे मनपाला व पाटबंधारे विभागाला दिल्याने तातडीने जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरवात केली.
या कामाचा शुभारंभ अमरसृष्टी १५ न येथे भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी आणि सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील धर्मे, गजानन भाऊ तुपे , निलेश दहिवाल, तात्या दिवेकर यांच्या उपस्थितीत झाला.
दुसऱ्या दिवशी शेवाळेवाडी येथे जलपर्णी काढण्याचा हभप रामदादा शेवाळे यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला. यावेळी माजी सरपंच पोपट कामठे, बबन दादा शेवाळे, माजी उपसरपंच प्रविण चोरघडे, प्रमोद कोद्रे, ग्रामपंचायत सदस्य विजय कोद्रे, राम खेडेकर,भाजपा नेते बबन जगताप, राजन चोरघडे, तुषार चोरघडे, राजेंद्र घुले, संभाजी हाक्के, दिगंबर शेवाळे, मोहन कामथे, अक्षय कामठे, कैलास जैस्वाल, चंद्रकांत शेवाळे, समर्थ शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध मान्यवर ग्रामस्थांनी यावेळी बोलताना राहुलदादा शेवाळे यांचे या कामाबद्दल अभिनंदन केले, तर नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मनपा उपायुक्त माधव जगताप यांनी जुन्या कॅनॉलमधील जलपर्णी काढण्यासाठी तत्परतेने निर्णय घेतल्याबद्दल राहुलदादा शेवाळे यांनी त्यांचे बोलताना आभार मानले.


Post a Comment