शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

महापुरुषांच्या विचारांमुळे व संविधानामुळे सर्व समाजामध्ये सहिषनुता बंधुभाव कायम


 अतुल सोनकांबळे
महाराष्ट्र पोलीस न्युज

पुणे इंदापूर : "महापुरुषांच्या विचारांमुळे व संविधानामुळे सर्व समाजामध्ये सहिषनुता बंधुभाव टिकून आहे. त्यामुळे देशात सामाजिक सौख्य आहे. अन्यथा आपला देश तालिबानी राष्ट्र झाले असते असे गौरवोद्गार इंदापूर वकील बारचे माजी अध्यक्ष व जेष्ठ विधीज्ञ नंदकुमार गणपतदास शहा बोलताना म्हणाले इंदापूर वकील संघटनेच्या वतीने आज महापुरुषांची संयुक्तपणे जयंती पहिल्यांदाच साजरी करण्यात आली.
            त्या प्रसंगी वकिल संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अँड. एन एस शहा, अध्यक्ष अँड. माधव शितोळे, उपाध्यक्ष अँड. धैर्यशील नलवडे, अँड. अनिल पारेकर, सचिव अँड. आसिफ बागवान, खजिनदार अँड. संकेत नगरे, ग्रंथपाल अँड. वैजनाथ गायकवाड, सदस्य अँड. विशाल राऊत, यांचेसह अँड. के.डी.यादव, सतिश देशपांडे, अँड. हेमंत नरूटे, अँड.भिमराव देवकर, अँड. धनंजय विंचू, अँड रणजित चौधरी, अँड. इनायत काझी, अँड. वैज्जुदीन मुलाणी , अँड. विकास देवकर, अँड. राजेंद्र सोमवंशी, अँड. किरण धापटे, अँड बापूसाहेब साबळे, शशिकांत  अँड. साबळे, अँड. अंजिक्य धारूरकर, अँड. अशुतोष भोसले, अँड.कुंडलिक मारकड, अँड. विनोद पारेकर आदींसह अनेक वकील व कर्मचारी उपस्थित होते.
         पुढे शहा बोलताना म्हणाले की, कोणताही धर्माने  महिलानां मंदिर, मस्जिद, चर्च या ठिकाणी उच्चपदावर बसविले नाही तर भारतीय राज्य घटनेमुळे आज भारत देशाची महिला राष्ट्रपती, पंतप्रधान अशा देशाच्या अतिउच्च पदावर विराजमान झाले आहेत.
             आपला वकीली व्यवसाय देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळेच चालतो यांची जाणीव प्रत्येक वकील मंडळी नी ठेवून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी वकील बांधवांची आहे .
          जयंतीच्या कार्यक्रमाचे नियोजन जेष्ठ अँड. के.आर तोरणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अँड. सुमित वाघमारे, अँड. राहूल बनसोडे,  अँड. नारायण ढावरे यांनी परिश्रम घेतले तर आभार ग्रंथपाल अँड. वैजनाथ गायकवाड यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post