शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

रोहिदास उंद्रे यांची भव्य मिरवणूक मांजरी खुर्द येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे हडपसर : मांजरी खुर्द व पूर्व हवेलीतील कार्यकर्त्यांचा जल्लोष पुणे, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालानंतर पूर्व हवेलीतील मांजरी खुर्द वाघोली, लोणीकंद, केसनंद आणि कोलवडी या गावांमध्ये समर्थक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत भंडाऱ्याची व गुलालाची मुक्त उधळण तसेच फटाक्यांची आतषबाजी करत, डीजेच्या तालावर या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून अण्णासाहेब मगर सहकार आघाडीचे सर्वसाधारण गटातून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य व बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे हे विजयी झाले, तर महिला राखीव गटातून केसनंद चे माजी सरपंच मिलिंद हरगुडे यांच्या पत्नी सारिका हरगुडे या विजयी झाल्या.

                त्याचप्रमाणे इतर मागास प्रवर्गातुन कोलवडीचे शशिकांत गायकवाड हे विजयी झाले. बाजार समितीच्या ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनलचे रामकृष्ण सातव तसेच अनुसूचित जाती माती गटातून नानासाहेब आबनावे व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून भाजप पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार आघाडीचे रवींद्र कंद विजयी झाल्यानंतर नगर रस्त्यावरील मांजरी खुर्द, वाघोली, लोणीकंद, केसनंद व कोलवडी येथे विजयी उमेदवारांसह समर्थक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. मांजरी खुर्द येथे विजयी उमेदवार रोहिदास उंद्रे यांची भव्य अशी मिरवणूक काढून मांजरी खुर्द व परिसरातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Post a Comment

Previous Post Next Post