अतुल सोनकांबळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे इंदापुर : दि. १५ एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस बेकायदेशीर रित्या जवळ बाळगणाऱ्या व्यक्तीस इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
संग्राम विलास मदने वय. २७ वर्षे (रा.काटी, ता. इंदापूर जि. पुणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव असुन विनापरवाना पिस्टल बाळल्या प्रकरणी इंदापूर पोलीस पुढील तपास करत आहेत. दि. १५ मे रोजी दुपारी ३ ते ३:३० च्या सुमारास गुन्हे शोध पथकाने काटी, ता. इंदापूर, जि. पुणे येथे संग्राम विलास मदने हा वेताळ बाबा मंदिरा जवळ त्याच्या कंबरेला गावठी पिस्टल असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथक इंदापुर पोलिस स्टेशन तात्काळ पोंहचले असता संशयित इसम संग्राम मदने यास पोलीस आल्याचे समजल्याने तो त्या ठिकाणाहून पळ काढत असता पोलिस पथकाने पाठलाग करुन पकडले व दोन पंचासमोर अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरलेला एक गावठी पिस्टल व पॅन्टच्या खिशामध्ये एक जिवंत काडतूस अढळुन आले.
बेकायदेशीर विना परवाना पिस्टल जवळ बाळल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

Post a Comment