सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : पुर्व हवेलीतील लोणी काळभोर ते उरुळी कांचन हा १८ किलोमीटर चा पट्टा नव्याने शहराला जोडललोणी काळभोर हडपसर हद्दीतील गाडीतळ ते पंधरा नंबर या दरम्यान खाजगी बस (ट्रॅव्हल) मुळे होणारी रात्रीची वाहतूक कोंडी सोडविण्याबरोबरच, उरुळी कांचन हद्दीतील तळवाडी चौकातील सततची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच उपाययोजना सुरु करण्यात येतील असे आश्वासन पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कदमवाकवस्ती येथे दिले.
काळभोर वाहतूक शाखेच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (ता. २७) वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या हस्ते फित कापून व वाहतूक शाखेच्या बोर्डाचे अनावरण करण्यात आले. त्याच बरोबर परीसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सहायक पोलीस आयुक्त मौला सय्यद, कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदकुमार काळभोर, उद्योजक व कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, लोणी काळभोर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल, पोलीस निरीक्षक सुनील जाधव, भोसरे, पोलीस उपनिरीक्षक रामदास जाधव, टिळेकर, स्थानिक गुन्हे ग्रामीण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, लोणी काळभोर वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
--उपायुक्त विजयकुमार मगर म्हणाले,--
“वाहतूक पोलिस हे वाहतूक नियमनातील एक घटक आहेत, ते शिस्त लावण्याचे काम करतात. मात्र पोलिसांनी कितीही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तरी, दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची वाढती संख्या व वाहन चालकात येत असलेल्या बेशिस्तपणामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिल वाढतच चाललेली आहे.” वाहतुक शाखेचे यांत्रिकीकरण करून वाहतूक सुधारण्याचा प्रयत्न केला तरीही, त्यास मर्यादा येणार आहेत. त्यासाठी नागरिकांमध्ये स्वयंशिस्त येणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच वाहतुकीची समस्या सुटू शकते, असे म्हणाले.
--वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल म्हणाले,--
“पुण्यात वाहनांची संख्या लक्षणीय आहे. पुणे - सोलापूर महामार्ग हा अतिसंवेदनशील आहे. त्यामुळे विशेषतः सकाळी व सायंकाळी रहदारीच्यावेळी वाहतुकीची समस्या निर्माण होते. ही समस्या पूर्णपणे संपू शकत नाही तरीही आम्ही पूर्णपणे वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न करीत आहोत. कदमवाकवस्ती ते उरुळी कांचन परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचारी यांना सहकार्य करण्याची गरज आहे.
या प्रसंगी लोणी काळभोर वाहतूक विभागाचे वपोनी अशोक शामराव तोरडमल, पोउपनि रामदास आण्णा जाधव, पोलिस हवालदार ज्ञानोबा बीभिषण बड़े, रामदास खंडू गिरमे, बापुराव संपतराव बांगर, विजय बब्रुवान कांबळे, विकास कैलास ओव्हाळ, सचिन विट्ठल शिंदे, उमेश चंद्रसेन ढाकणे, अनिल विश्वनाथ गायकवाड, विजय सोन्याबापू दाभाडे, महीला पोहवा सुफिया जमिर इनामदार/ शेख, पोना. गणेश मधुकर गोसावी, हनुमंत रघुनाथ कर्चे, विवेक चंद्रकांत जगताप, प्रविण माधव म्हेत्रे, चेतन सतिश सुलाखे, आनंद नागनाथ सांळुखे, महिला पोना. आरती गौरव खलचे, पोशि समिर सुभाष काकडे, महेश लक्ष्मण मडके, योगेश रामभाऊ काकडे, विजय प्रताप कानेकर, सचिन भिवाजी कांबळे, राजेश ज्ञानेश्वर पवार, सचिन शिवाजी कांबळे, महिला पोशि. नाहीद समीर शेख, मनिषा भगवान नरवडे व ट्राफिक वार्डन मदतनीस सागर राऊत, दादा लोंढे, सुशांत वरीळीकर, निखिल सातव उपस्थित होते.




Post a Comment