शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

चिंता नको, एटीएम मधून फाटक्या नोटा मिळाल्या तर करा 'हे' काम करा


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज

पुणे : बँक एटीएम मधून फाटक्या नोटा मिळाल्या तर घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीएम मधून निघालेल्या फाटलेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी नियम केले आहेत. आणि त्यासाठी कोणते चार्जही आकारले जाणार नाही. 



--नागरीकांनी अशा बदलून घ्या फाटक्या नोटा--


           एटीएममधून फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेच्या एटीएममधून नोटा बाहेर आल्या त्या बँकेत जावे लागेल. तिथे गेल्यावर तुम्हाला अर्ज लिहावा लागेल. ज्यामध्ये तुम्हाला पैसे काढण्याची तारीख, वेळ, ठिकाण याची माहिती लिहावी लागेल. अर्जासोबत एटीएममधून ट्रांझेक्शन संबंधित मिळालेली स्लिपही जोडावी लागेल. जर स्लिप जारी केली नसेल, तर मोबाईलवर मिळालेला ट्रांझेक्शनचे डिटेल्स द्यावे लागतील. यानंतर तुमच्या नोटा बँकेद्वारे बदलल्या जातील.



--नोटा बदलून मिळाल्या नाही तर बँकांना होणार दंड--


        रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, एटीएममधून खराब किंवा बनावट नोट बाहेर पडल्यास त्याची जबाबदारी बँकेची असेल. बँकांनी खराब नोटा बदलून घेण्यास नकार दिला तर त्यांना १० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. हा नियम सर्व बँक शाखांना लागू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post