शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पावसाळी गटारी साफ करण्यासाठी तीस कोटींचे बजेट अद्याप काम सुरू नाही : शिवसेनेचे उपविभागप्रमुख महेंद्र बनकर


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे हडपसर : मागील वर्षाचा अनुभव पाहता हडपसर परिसरातील वाहणारे दोन नाले पावसाळी गटारे व जुना बंद कालवा पावसाळ्यापूर्वी साफ सफाई करण्याच्या मागणीचे पत्र शिवसेनेचे उपविभागप्रमुख महेंद्र बनकर यांनी हडपसर क्षेत्रिय सहायक आयुक्त प्रसाद काटकर यांना दिले.

           महेंद्र बनकर म्हणाले पुणे महापालिकेने  पावसाळ्यापूर्वी ओढे-नाले, पावसाळी गटारी साफ करण्यासाठी तीस कोटींचे बजेट दिले आहे. परंतु हडपसर परिसरातील नाल्यांची तसेच पावसाळी गटारे साफसफाई चे काम कुठेही सुरू दिसत नाही. एवढे बजेट असताना यंत्रणा नाले पावसाळी गटारी यांच्या साफसफाईच्या कामासाठी का म्हणून हलगर्जीपणा करत असतील. कारण त्यापुर्वी हडपसकरांना यांची किंमत मोजावी लागलेली आहे.

          संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर नाल्यांची तसेच पावसाळी गटारे यांची करावी अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने कायदेशीर मार्गाने मोर्चा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

             यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी दत्ता खवळे, संतोष होडे, विद्या होडे, अनिकेत सपकाळ, अजय सपकाळ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post