सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय आयोजित, एएमएम स्पोर्ट्स कार्निवल २०२३ अंतर्गत जलतरण स्पर्धा फ्री स्टाईल, बटर फ्लाय, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक, ४*५० मीटर रिले ह्या विविध प्रकारात संपन्न झाल्या.
या स्पर्धा ए.के. फिटनेस क्लब लोणी काळभोर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेच्या विजेत्यांना मेडल्स व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, प्रा.अनिल जगताप, प्रा.एम.जे.खैरे उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीप्रमाणे ५० मीटर फ्री स्टाईल प्रथम क्रमांक अनिश कांबळे, द्वितीय क्रमांक विशाल कोलते, तृतीय क्रमांक आबुदुराब तांबोळी.
१०० मीटर फ्री स्टाईल प्रथम क्रमांक आकाश गायकवाड, द्वितीय क्रमांक अमन शेख, तृतीय क्रमांक अनिल चव्हाण. 50 मीटर बटरफ्लाय प्रथम क्रमांक धीरज सोनवणे द्वितीय क्रमांक सुरज दातिर, तृतीय क्रमांक आविष्कार थोरात. १०० मीटर बटर फ्लाय प्रथम क्रमांक अमोल गायकवाड, द्वितीय क्रमांक नीरज पवार, तृतीय क्रमांक आकाश गायकवाड. ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम क्रमांक महादेव पारेकर, द्वितीय क्रमांक अमोल गायकवाड, तृतीय क्रमांक आदित्य चव्हाण. बॅक स्ट्रोक प्रथम क्रमांक ऋतूज शिंदे, द्वितीय क्रमांक नितीन घनवट, तृतीय विशाल कोलते. ४*५० मीटर रीले प्रथम क्रमांक (सांघिक)प्रितेश ओव्हाळ, अमोल गायकवाड, धीरज सोनवणे, नितीन घनवट. मुलींच्या गटात ५० मीटर फ्रीस्टाईल पोहणे प्रथम क्रमांक सविता खेडकर, द्वितीय क्रमांक भारती घाडगे, तृतीय क्रमांक भाग्यश्री गोपीवाड. या स्पर्धांचे संयोजन प्रा. प्रीतम ओव्हाळ यांनी केले.


Post a Comment