सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : डोळ्यात लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न घेऊन दरवर्षी लाखो युवक, युवती महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, संभाजीनगर सारख्या मोठं मोठ्या शहरात UPSC, MPSC ची तयारी करण्यासाठी येतात...
आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करुन चांगली पोस्ट मिळवून समाजासाठी स्वतःसाठी एका चांगल्या जीवनाची स्वप्नं त्यात रंगवलेली असतात जे अगदी बरोबर आहे. आणि स्वप्न पाहणे हे ही चुकीचे नाही.
पण सध्या स्पर्धा परीक्षेत वाढत चाललेली स्पर्धा...बोटांवर मोजण्या इतक्या जागांसाठी लाखांमध्ये होत असलेली चुरशीची लढत पाहता ही स्पर्धा खुपच जीवघेणी आहे.
याची प्रचिती येते....जे विद्यार्थी पद मिळवून चांगलं काम करत आहेत त्यांचं अभिनंदन आहेच पण या स्पर्धेच्या ओघात वाढत चाललेलं वय, हातातून निसटत चाललेली आयुष्यातील उमेदीची वर्षे या पूर्ण गोष्टींचा सखोल अभ्यास केला तर हजारो विद्यार्थी आज मानसिक दृष्ट्या दबावाखाली आहेत. वाढती लोकसंख्या आणि कमी होत असलेल्या शासकीय नोकरीच्या संधी याचा आलेख सुध्दा प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घ्यायला हवा.
अशाच निरागस स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी विद्यार्थ्यां प्रमाणेच पुण्यात MPSC चा अभ्यास करण्यासाठी आलेले माझे मित्र रत्नाकर मोरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रज्ञा मोरे यांच्या (PradnyaRatna Foods) या उद्योगसमूहाला भेट देण्याचा योग आला. आज शासकीय नोकरी किंवा कोणत्यातरी खासगी क्षेत्रात अल्प पगारावर काम करत समाधान मानणाऱ्या आपल्या मराठी युवकांनी नक्कीच काहीतरी बोध घ्यावा याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रत्नाकर मोरे आणि प्रज्ञा मोरे MPSC चा अभ्यास करताना २ ते ४ गुणांनी पद हुकल्यावर संधी गेली. त्यातच कोरोना सारखी गंभीर परिस्थिती उद्भवली आणि सर्वांचीच आर्थिक गणितं कोलमडली पण कणभरही खचून न जाता पुण्यात जिजाऊ गर्ल्स होस्टेल या नावाने महिला वसतीगृह सुरु करुन या दोघांनीही उद्योग क्षेत्रात पदार्पण केलं.
पुण्यासारख्या शहरात उद्योगाच्या अनुभवातुन आणि प्रज्ञा यांचं फूट टेक्नोलॉजी मध्ये शिक्षण झालं असल्याने त्याच शिक्षणाच्या जोरावर दोघांनी मोठं धाडस करत (PradnyaRatna Foods) या नावाने एक छोटी (Food Industry) च उभा केली. आणि याला प्रचंड प्रतिसाद सुध्दा मिळत आहे. शासकीय नोकरी म्हणजेच सर्वस्व असं मानुन वर्षानुवर्ष जीवनातील उमेद गमावणार्या माझ्या महाराष्ट्रातील लाखो युवकांसाठी खरंच ही एक प्रचंड मोठी उर्जा आणि प्रेरणा आहे. मित्रांनो, जीवनाच्या प्रवासात चालत असताना प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईल हा भ्रम मनातून काढून टाका. प्रत्येकामध्ये काही न काही सुप्त गुण असतात ते आपण ओळखले की आवडीच्या क्षेत्रात आपणही आपलं नाणं खणखणीत वाजवू शकतो फक्त हाच आत्मविश्वास तुमच्या मस्तकी असु द्या. अपयशाने खचून न जाता ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे, स्कोप आहे त्या क्षेत्रात मुक्त मनाने गगनभरारी घेण्याची तयारी ठेवा.
येत्या काळात महाराष्ट्रात वाढत असलेली वाढती बेरोजगारी आणि हतबल होत चाललेल्या लाखो युवकांना सोबत घेऊन मोठं उद्योग विश्व आपण सर्वजण साकार करणार आहोत. माझे लाडके मित्र रत्नाकर आणि प्रज्ञा यांच्या भावी उद्योग यशासाठी जसा प्लास्टिक B चा उपयोग केला तोच आजच्या तरुण पिढीने वापरने गरजेचे.

Post a Comment