शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शेतकरी सुखावणार ; मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री ; पावसाची हजेरी लागणार


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे : राज्यातील शेतकरी राजासाठी आनंदाची बातमी आहे. येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. 

             हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळं काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

            तसेच दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भागही नैऋत्य मॉन्सूनने व्यापला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसळीकर यांनी दिली आहे.


--दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भागही नैऋत्य मॉन्सूनने व्यापला--


          अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय या चक्रीवादळामुळे बंगालचा उपसागर ते म्यानमार किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. ही स्थिती मान्सूनसाठी अनुकूल स्थिथीमुळे नैऋत्य मोसमी वार्याची आगेकूच सुरू राहिल. मान्सूनसाठी निर्माण झालेल्या पोषक स्थितीमुळे मान्सून पुढील पुढील दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.



                मान्सूनने आज पश्चिम किनारपट्टीवरच्या कर्नाटकातल्या कारवारपर्यंत मजल मारली आहे. येणाऱ्या दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्राचा काही भाग व्यापण्याचा अंदाज वर्तवली जातोय. यंदा मान्सून केरळात उशीरा पोहचला. नियोजित वेळेपेक्षा आठवडाभरचा विलंब झाला. मात्र आता लांबलेल्या मान्सूनने कर्नाटकचा काही भाग बंगालच्या उपसागरात प्रवेश केला आहे. आता येणाऱ्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्राची किनारपट्टी, गोवा, अरबी समुद्राचा मध्य भाग पावसाने व्यापण्याची शक्यताशक्यता वर्तवण्यात येत आहे. 

               मॉन्सूनने गुरुवारी (दि.८) केरळमध्ये हजेरी लावली. तर शनिवारी (दि. १०) मॉन्सूनने पश्चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात मॉन्सूनने धडक दिली. आता हा मॉन्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post