शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

"या" तारखेला श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार.. अयोध्येत रामलला होणार विराजमान ; १० दिवस धार्मिक विधी होणार


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे : अयोध्येतील राम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठापनेची तारीख जाहीर करण्यात आली असून २४ जानेवारी २०२४ दरम्यान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा व दर्शनासाठी खुले केले जाईल. २४ तारखेला मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले होणार असे मंदिर  समितीच्या अध्यक्ष यांनी सांगितले. 

            शेवटच्या दिवसासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तीन ते चार महिनेच्या कालावधी आधी श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. 

             दरम्यान, मंगळवारी  श्री राम मूर्तींची प्राण प्रतिष्ठापणेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता पर्यंत राम मंदिराचं बहुतांशी काम पूर्ण झालेले आहे. रामभक्तांना याची प्रतीक्षा होती. श्री राम मंदिर आता याची तारीख आज अखेर जाहीर झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post