शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

साधना पाटील या विद्यार्थ्यांनीचा भव्य सत्कार मोखाडा तालुक्यात नवोदय परीक्षेत एकच विद्यार्थिनी उत्तीर्ण


 भाऊ वैजल

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पालघर : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते पिल्यानंतर मनुष्य गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, या म्हणी प्रमाणे पळसुंडे जि. प. शाळेतील विदयार्थीनी साधना पाटील  इयत्ता ५ वी या विद्यार्थिनीने जवाहर नवोदय परीक्षेमध्ये भाग घेऊन उज्वल यश संपादन करून मोखाडा तालुक्यात उत्तीर्ण झाली आहे साधना उत्तीर्ण झालेली एकमेव विद्यार्थ्यांनी आहे.

            ‌त्यामुळे तिने आपले, आई वडिलांचे, शाळेचे, गावाचे, ग्रामपंचायत आणि पर्यायाने तालुक्याचे नाव रोशन केले आहे. म्हणून हि बाब अभिमानास्पद आणि गौवरवाची आहे याची दखल घेत ग्रामपंचायत सातूर्ली पळसुंडे यांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच प्रमिलाताई वांगड यांच्या हस्ते साधनाचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला. 

           या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच प्रमिलाताई वागड, उपसरपंच तुळशीराम वाघ, सर्व सन्माननीय ग्रा. प. सदस्य साधनाचे वडील सुनील पाटील आई मुक्ताताई पाटील, मोठेबाबा कृष्णा पाटील यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते गंगाराम वांगड जि. प. शाळा पळसुंडे येथील शिक्षक पाटील, भाकरे, राठोड, नडगे, व ग्रामपंचायत कर्मचारी सदू वाजे यांनी उपस्थित राहून बहुमूल्य मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाप्रसंगी सातूर्ली जि. प. शाळेतील सर्व विद्यार्थिनीने सहभाग नोंदवला. कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार ग्रामपंचायतच्या ग्रामसेवीका वैशाली गोसावी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post