शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

अक्षय भालेराव यांच्या कुटुंबाला तात्काळ ५० लाखाची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी : भिमशक्ती संघटनेची मांगणी


 अतुल सोनकांबळे 

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (इंदापुर) : नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील अक्षय भालेराव यांच्या  कुटुंबाला  तात्काळ ५० लाखाची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी असे इंदापुर तहशील कार्यालय यांना भिमशक्ती सामाजीक संघटनेनी  निवेदनाद्वारे मांगणी केली. 

            एकीकडे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक साजरा करत असताना सर्व जाती-धर्माला सामान वागणूक देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या या राज्यात नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथील अक्षय भालेराव निर्घृण हत्याप्रकरणी काळीज पिळूवटुन टाकणारी घटना आपल्या राज्यामध्ये घडलेली आहे. मागासवर्गीय समाज सुरक्षित नाही असं म्हणलं तर गैर नाही समाज सुरक्षित आहे काय  हा प्रश्न आहे. केवळ महार  समाजाचा आहे म्हणून आणि गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून ज्या पद्धतीने पोटात खंजीर भोसकून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आला. हे गुंड प्रवृत्ती इथपर्यंत न थांबता त्यांनी अक्षयच्या भावाला आणि आईला मारण्याचा प्रयत्न केला. 

            ही घटना या राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी असून तसेच लातूर जिल्ह्यातील रेनापुर या गावांमध्ये मातंग समाजाच्या तरुणांवरही सावकारकीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाला. या गंभीर घटनेचा भीमशक्ती सामाजिक संघटना इंदापूर तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.


--भिमशक्ती सामाजीक संघटनेचे इंदापुर तालुका अध्यक्ष युवराज पौळ--


          भालेराव यांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा. सदर प्रकरण हे मानवतेला काळीमा फासणारे असुन या अनुषंगाने काही मागण्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो १) अक्षय भालेराव च्या कुणाचा निष्पक्ष तपास SIT लावून त्यांचे मार्फत तातडीने करण्यात यावा. २) अक्षय भालेराव व त्याच्या कुटुंबास तातडीने ५० लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात यावी. ३) अक्षय भालेराव चा जखमी भाऊ आकाश भालेराव यास शासकीय नोकरी देण्यात यावी. ४) अक्षय भालेराव निर्घृण हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे. ५) या प्रकरणात कायदेतज्ञ सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी. ६) अक्षय भालेराव यांच्या संपूर्ण कुटुंबास तात्काळ कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावे. ७) नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावातील सर्व बौद्ध समाजाच्या संरक्षणासाठी नवीन पोलीस चौकीची स्थापना करावी. जेणेकरून सर्वांमध्ये कायद्याची भीती राहील. ८) अक्षय भालेराव च्या प्रकरणांमध्ये त्या सर्व आरोपींची व त्यांना साथ देणार्यांची ब्रेन मॅपिंग व नार्को टेस्ट करण्यात यावी. ९) अक्षय भालेरावचा खून करणाऱ्या आरोपींची व त्यांना साथ देणाऱ्या गिधडांची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्यात यावी. १०) ॲट्रॉसिटी च्या पीडित व अन्यायग्रस्त कुटुंबांना समाजकल्याण च्या मार्फत मिळणारी आर्थिक मदत मिळत नाही. ११) ज्यावेळेस एखादा पीडित अन्यायग्रस्त व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जातीवाचक शिवीगाळ, मारहाण, खालच्या दर्जाची वागणूक दिल्याने तक्रार देण्याकरिता आल्यानंतर काही प्रशासकीय अधिकारी ॲट्रॉसिटी ॲक्ट ची कडाक आमलबजावणी न करता त्या आरोपींना तात्काळ जामीन कशाप्रकारे मिळेल यासारखे पोलीस कलम टाकून या राजकीय गावगुंडांना मोकाट खुन करण्यासाठी सोडतात. १२) मागासवर्गीय समाजातील एखादा अनुसूचित जाती व जमाती या समाजातील पीडित आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात पोलीस स्टेशनला आपली  तक्रार देण्यासाठी आल्यानंतर काही राजकीय पुढार्‍यांच्या व जातीयवादी पोलीस अधिकार्यांच्या दबावाखाली या पीडितांवरती खोटे व बनावट चोरी, दरोडा व हाफ मर्डर सारखे गंभीर स्वरूपाच्या गुन्हा मध्ये अडकवण्याच्या धमक्या देऊन ॲट्रॉसिटी ची केस मागे घेण्यास भाग पाडतात. यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळत नाही. १३) महाराष्ट्र राज्यामध्ये आत्तापर्यंत ॲट्रॉसिटी केस ला क्रॉस म्हणून दुसरे गंभीर स्वरूपाचे कलम त्या पिढीतांवर दाखल झालेले आहेत त्याचीही सखोल चौकशी करण्यात यावी. इत्यादी मांगन्यांचे निवेदन देण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post