सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (वानवडी) : दि.२२/१२ /२०२२ रोजी यातील फिर्यादी हया नमुद ता. वेळी व ठिकाणी त्याची मैत्रिण सरला शिंगाणे रा. सातबनगर हडपसर पुणे हिचे राहते घरी हळदी कुंकु चे कार्यक्रमास पायी आधार हॉस्पिटल शेजारी असलेल्या किराणा मालाचे दुकानाचे शेजारील गल्ली सातवनगर हडपसर पुणे येथून जात असताना अचानक गल्लीतुन समोरुन आलेल्या अज्ञात दुचाकी वरील दोन अनोळखी इसमापैकी मागे बसलेल्या अंगात निळ्या रंगाचे जर्किन व डोक्यात जर्किनची कॅप (हुडी) घातलेल्या इसमाने फिर्यादी याचे गळ्यातील २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मीनी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावुन घेवुन चोरुन ते दोघे तेथुन भरधाव वेगाने निघुन गेले आहेत असे वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असता
त्यानुसार गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक संतोष सोनवणे तपास पथक, वानवडी पोस्टे हे करत आहेत.
या दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास पथक प्रभारी पोउपनि संतोष सोनवणे यांनी तपास करत असताना, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच मा. पोलीसा उप-आयुक्त, परिमंडळ-५, पुणे शहर यांनी एबीसी कॅटेगरी आरोपीत चेकींग दरम्यान पोअं/ संदिप साळवे, विष्णु सतार, राहुल गोसावी यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे इसम नामे गजानन दत्तात्रय बोराडे, वय ३०, राहणार हिवरकरमळा, सासवड, पुणे यास ताब्यात घेवून तपास करत असते वेळी आरोपीत यांने वर नमूद दाखल गुन्हा तसेच वानवडी पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजि.नंबर ४४५/२०२२ भादंवि कलम ३९२, ३४ तसेच वानवडी पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजि नंबर २६२ / २०२३ भादंवि कलम ३९२,३४ गुन्हा केल्याची कबुली देवून, त्याप्रमाणे गुन्हयातील एकुण रू. १,६२,०००/- रक्कमेचा मुददेमाल हस्तगत करणेत आलेला आहे.
--अटक केलेल्या आरोपीत यांचे नावे पुढीलप्रमाणे--
१. गजानन दत्तात्रय बोराडे, वय ३०, राहणार हिवरकरमळा, सासवड, पुणे २ माउली उर्फ ज्ञानेश्वर भिकाजी चव्हाण वय २२ वर्षे, राहणार कुणेश्वर, सोलापूर.
आरोपी यांचेकडुन वानवडी पोलीस ठाणे येथील खालील गुन्हे उघड करणेत आलेले आहेत.
१) ५२६ / २०२२ भादंवि कलम ३९२.३४
२) ४४५/२०२२, भादंवि कलम ३९२, ३४
३) २६२ / २०२३ भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सहपोलीस आयुक्त श्री संदिप कर्णीक, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि.-५, पुणे शहर श्री विक्रांत देशमुख, व मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर श्री. शाहुराजे साळवे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, पो. अंम. अमोल गायकवाड, विठठल चोरमले, अतुल गायकवाड, संतोष नाईक, हरीदास कदम पोअं /- निलकंठ राठोड, राहुल माने, यतिन भोसले व सोनम भगत यांनी केली आहे.

Post a Comment