अतुल सोनकांबळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे इंदापूर : तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता खरात यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येणार.
सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी कष्टकरी विद्यार्थी युवक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच महिला दक्षता समितीच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवणे तसेच गोरगरिबांना मदत करणे. तसेच राष्ट्रीय संसद सरपंच संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नासाठी सतत झटत राहणे या व अशा अनेक प्रश्नावर नेहमी काम करत असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच अनिता खरात आणि त्यांच्या वाढदिवशी वेगवेगळ्या गावातील ग्रामस्थांनी व युवा कार्यकर्त्यांनी अनिता खरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्यां कामाला साजेल असेल सामाजिक उपक्रम घेण्याचे ठरवले आहे,
त्यात खोरोची, रेडणी, हिंगणगाव, इंदापूर, टेंभुर्णी, वडापुरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी तेथील स्थानिक ग्रामस्थांनी व युवकांनी अनिता यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, फळे वाटप, लहान मुलांना खाऊ वाटप ,वृद्ध मातापित्यांना जेवण असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

Post a Comment