शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पाठपुरावा-- हडपसर परिसरात महापालिकेच्या ५०० बेडच्या मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचा


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


  पुणे (हडपसर) : आण्णासाहेब मगर आरोग्य केंद्रात सर्व सोयीसुविधा, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, अतिदक्षता विभाग इतर सर्व चाचण्या, सोनोग्राफी मशिन, एक्सरे मशिन, दंतचिकित्सा, सर्व आजारांवरही औषधें अशी विविध आजारांवर उपचारांसाठी मल्टीस्पेशालिटी सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात.

           तसेच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी बाबतचे दि. २१ जून रोजी महापालिका भवन येथे मुख्य आरोग्य प्रमुख भगवानराव पवार यांना उपविभागप्रमुख महेंद्र बनकर यांच्या हस्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले.

          या प्रसंगी विभाग प्रमुख दत्ता खवळे महिला आघाडीच्या प्रवक्त्या विद्या होडे, शाखाप्रमुख अनिकेत सपकाळ कुणाल वाघ, युवा सेना मयूर फडतरे काँग्रेसचे अक्षय बहिरट उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post