डॉ.गंगाराय उबाळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
बुलढाणा (सिंदखेडराजा) : पाण्यासाठी समस्त गावकऱ्यांचा ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य घागर मोर्चा काढला.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील समस्त गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आज दि. २३ जुन रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर मोर्चा काढला मागील चार महिन्यापासून मलकापूर येथील स्थानिक रहिवासी यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ८ हजार लोकसंख्या असलेल्या गावात पंधरा ते वीस दिवस प्रत्येक वार्डात नळासाठी वाट पाहावी लागते तर दुसरीकडे ग्रामपंचायत संबंधितांच्या घरात मुबलक पाणी सोडले जात असल्याचा आरोप करत पाणि द्या पाणी द्या..नाहीतर खुर्च्या खाली करा असे निर्देशने दिले.
ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतच्या विरोधात उभे राहिले आहे. मलकापूर पांगरा नळ योजनेसाठी दोन कोटी ९० लाख रुपये मिळाले असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी मलकापूर पांगरा ग्रामवासियांना भटकंती करावी लागत आहे. मुबलक पाणी असताना देखील पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केल्या जातो. महिलांनी पाणी मिळत नसल्याकारणाने ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला. या निवेदनावर लगबग २०० पेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून ते निवेदन ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य समीना शेख निसार पटेल, किरण काकडे, राजू साळवे, साबीर खान पठाण या चार ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले. मलकापूर पांगरा येथील पाणी प्रश्न पेटला असून पाण्यासाठी प्रशासन याकडे लक्ष देणार आहे का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.


Post a Comment