शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

समर्पण ओल्ड एज होम व रिहॅबिलेशन सेंटर पुणे यांच्या मार्फत मोफत आरोग्य सेवा : संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मासाळ


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (हवेली) : श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी व वारकऱ्यांसाठी समर्पण ओल्ड एज होम व रिहॅबिलेशन सेंटर पुणे यांच्यातर्फे तिसऱ्या वर्षीही मोफत आरोग्य सेवा देण्यात आली.



               कदम वाक वस्ती ग्रामपंचायत मध्ये सिद्धिविनायक पार्क, स्टार सिटी येथील असणाऱ्या समर्पण ओल्ड एज होम व रिहॅबिलेशन सेंटर पुणे उपक्रम राबविण्यात आला.



            सालाबाद प्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे औचित्य साधून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी व भाविक भक्तांसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून ते संध्याकाळी सात पर्यंत मोफत आरोग्य सेवा देण्यात आली येणाऱ्या वारकऱ्यांना थंडी, ताप, अंग दुखी, डोकेदुखी, हातपाय दुखी, पोटदुखी, जुलाब ,खोकला यासारख्या अनेक औषधांचा मोफत पुरवठा करण्यात आला. तसेच आवश्यक असणाऱ्या वारकऱ्यांचा बीपी चेक करणे औषधी तेल, मलम लावून मालिश करणे. यासारख्या मोफत सेवा देण्यात आल्या.

               लक्ष्मण मासाळ यांनी सुरू केलेल्या समर्पण ओल्ड एज होम अँड रिहॅबिल्सन सेंटर मध्ये मध्ये सध्या महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील देखील ४५ आजी- आजोबा वास्तव्य करीत आहेत. त्यांची देखभाल करण्यासाठी १६ कर्मचारी काम करतात. तेथे राहणाऱ्या वृद्ध आजी-आजोबांना नर्स, डॉक्टर्स, अटेंडन्स यांच्यामार्फत सेवा- सुविधा पुरवल्या जातात. मोफत आरोग्यसेवा पुरवण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वतःहा लक्ष्मण मासाळ, राजेंद्र कांबळे, संदीप नवले, हभप. सुशील महाराज काळभोर, सोमनाथ पुणेकर, महेश कुळपे, डॉ. करूना गायकवाड, नर्स हर्षली मासाळ, प्रतीक्षा सपकाळ, ब्रदर्स शाम भुयार, जालिंदर खराडे यांचे सहकार्य लाभले.



Post a Comment

Previous Post Next Post