मुख्य संपादक
स्मिता बाबरे
पुणे : डॉ.अब्दुल कलाम यांच्या नंतर ज्यांनी अंत:करणात स्थान मिळवळे असे अधिकारी म्हणजे मा. जावेद अहमद.
जावेद साहेब १९८० च्या बॅच चे IPS अधिकारी . केवळ देशसेवा करायची म्हणून नोकरी करणारे. अहमदसाहेब मूळचे उत्तर प्रदेशातील नबाब घराण्यातील असून त्यांच्या घराण्यातील कोणी नोकरी करत नाहीत. आजही सर्वजन राजेशाही आयुष्य जगत आहेत. अब्जावधीच्या संपत्तीचे ते मालक आहेत.
अपवाद वडीलांचा कारण वडीलही (काझी मुख्तार अहमद) सेवानिवृत्त IAS अधिकारी होते.
१९८० मध्ये IPS होऊन नोकरीत हजर झाल्यानंतर आपण फक्त एक रूपया मासिक पगार घेऊन उर्वरित पगाराची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करायला सुरवात केली. ३६ वर्षे नोकरीतून सेवानिवृत्त होईपर्यंत हे व्रत पाळले.
मा जावेदसाहेब यांनी सेवेत असताना खाजगी कामासाठी सरकारी गाडी कधीही वापरली नाही. खाजगी गाडी वापरत. अश्या या सेवानिवृत, राष्ट्रभक्त मा. जावेद अहमद साहेब या अधिकार्यास सलाम!!

Post a Comment