सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : मांजरी बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकात आम आदमी पार्टी प्रभाग क्रमांक २२ चे अध्यक्ष राजेंद्र साळवे यांच्या वतीने स्वराज्य संवाद यात्रा या सभेचे आयोजन करण्यात आले.
या सभेत गणेश ढमाले, लक्ष्मण भोसले अध्यक्ष आईसाहेब प्रतिष्ठान, बाळासाहेब घुले, अध्यक्ष छत्रपती शिवाजी स्मारक समिती, निलेश भोसले, पप्पू भोसले, गंगाराम खरात, विशाल भोसले, बाळासाहेब रणपिसे, दीपक जगताप, दत्तात्रेय ननवरे अध्यक्ष जनाधार दिव्यांग संस्था, रोहन गायकवाड, महेंद्र लोंढे, दादा भंडारी, परशु भंडारी, रोशन ढिले तसेच सुनीता ढेकणे, सविता सोनवणे, संगीता लोखंडे, माया शिंदे, रोहिणी शेंडकर, श्रीमती सुमन कुंभार, सुरेखा गायकवाड, श्रीमती सारिका प्रतापे, श्रीमती कल्याणी गायकवाड, कीर्ती कांबळे, वर्षा हाके, राणी लोंढे, जनाबाई पवार, बेबी सावंत, कविता सोनवणे, गौतमी कांबळे, शोभा शर्मा, फुल कुमारी देवी हजर होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे स्वराज्य निर्माण केले ते अठरापगड जाती धर्मांना सोबत घेऊन तसेच स्वराज्य गोर गरिबांच्या भाजीच्या देठालाही हात न लावता स्वराज्य निर्माण करायचं या उद्देशाने स्वराज्य निर्माण केले. हाच उद्देश ठेवून आम आदमी पक्षातर्फे स्वराज्य संवाद यात्रा काढली जात आहे. याच आप पार्टीने दोन राज्यामध्ये स्वराज्य निर्माण केले. व गोर गरीब जनतेला शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी या मूलभूत सुविधा विनामूल्य दिल्या. अशाच पद्धतीने मांजरी बुद्रुक येथील माळवाडी कुंजीर वस्ती सटवाई नगर वेताळ वस्ती राजीव गांधी नगर ७२ घरकुल ११६ घरकुल इत्यादी झोपडपट्टी भागासह गावठाण मधील गोरगरीब जनतेला सुविधा मिळाव्यात असे आश्वासन यावेळी जनतेला संबोधित करताना राजेंद्र साळवे यांनी दिले.
लक्ष्मण भोसले यांनी जनतेसाठी केलेल्या सामाजिक कार्याची व आम आदमीच्या कार्याची तुलना करून खऱ्या अर्थाने समाजामध्ये या पक्षाने नेत्रदीपक कामगिरी केली असे सांगितले. बाळासाहेब घुले यांनी छत्रपती शिवाजी स्मारक बनविले त्यांच्याच प्रेरणेतून मांजरी गावातील संपूर्ण भागामध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी गेली तीस वर्ष संघर्ष करून या भागातील लोकांना विविध प्रश्न संदर्भात सोडवणूक करण्याचा प्रयत्न आंदोलनाच्या माध्यमातून केलेला आहे व तो यापुढेही करण्यात येईल यामध्ये पक्षाची भिंत आडवी येऊ देणार नाही असे सांगितले.


Post a Comment