अतुल सोनकांबळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (इंदापुर) : तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या अनिता खरात यांचा वाढदिवस विविध गावच्या ग्रामस्थांनी सामाजिक उपयोगी कार्यक्रमातून साजरा केला.
वाढदिवस आकर्षण ठरले ते रेडनी येथे कल्पनाताई घोगरे यांनी हुबेहूब खरात यांची रांगोळी काढली. रेडनी येथे सरपंच हिराबाई खाडे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत सारिकाताई काळकुटे यांनी वृक्षारोपण मुलांना खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा केला.
साखरे वस्ती खोरोची हेगडकर वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना सोमेश्वर वाघमोडे व तानाजी हेगडकर यांच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप खाऊ वाटप व वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी खोरोची गावातील सर्व पक्षातील कार्यकर्ते व नेते उपस्थित होते. श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथे गरजू विद्यार्थ्यांना सुधीर पाडूळे व रुपेश वाघमोडे यांच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वडापुरी शाळेतील सर्व स्टाप व ग्रामस्थ उपस्थित होते, टेंभुर्णी येथे गोविंद वृद्धाश्रमात वृद्ध माता पीत्यांना उद्योजक लक्ष्मण वाघमोडे यांच्या माध्यमातून धरमचंद पप्पा लोढा यांच्या मार्गदर्शनात अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
हिंगणगाव येथे सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांच्या उपस्थितीत गणेश भाऊ शिंगाडे मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप करून तर इंदापूर येथील मूकबधिर शाळेत सद्दाम बागवान यांच्या वतीने मुलांना खाऊ वाटप करण्यात आले, उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे हनुमंत यमगर मित्र परिवाराच्या वतीने रुग्णालयास भिंतीवरील मोठे घड्याळ भेट देण्यात आले कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर नॅपकिन मास्क भेट देण्यात आले. अवसरी येथील वाचनालयास संदीप रेडके यांच्या वतीने महामानवांची पुस्तके भेट देण्यात आली.
इंदापूर तालुक्यात अतिशय उत्साहात अनिताताई खरात यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.





Post a Comment