भाऊ वैजल
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पालघर (माखोडा) : ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे नकुल गणेश ठाकरे यांच्या मुलीची तब्येत बरी नसल्या कारणाने संध्याकाळी आपल्या मुलीला रुग्णालयात घेऊन गेले व केस पेपर मागितला असता नर्स अनिता सूर्यवंशी यांनी त्या रुग्णाला गैरवर्तणुकीची भाषा वापरत "आता साडेसहा वाजलेत ओपीडी टाइमिंग संपला व तुम्ही पेशंट घेऊन सकाळी ओपीडी टाइमिंग मध्ये यायचे होते. अशा अर्वाच्य भाषेत त्या रुग्णाला धुडकावले.
नकुल ठाकरे यांनी डॉक्टरांकडे जाऊन हा प्रकार सांगितला असता त्या डॉक्टरांनी केस पेपर दिला व पेशंट वर उपचार केले.
मात्र नकुल गणेश ठाकरे हे युवा उद्योजक उच्चशिक्षित आदिवासी तरुण असून त्या झालेला अन्याय सहन झाला नाही. माझ्यासारख्या शिक्षित तरुणाला "लोकसेवक" गैरवर्तुणुकीची भाषा वापरत असतील तर या आमच्या गोरगरीब आदिवासी जनतेने काय करायचे असा प्रश्न आदिवासी जनतेला पडला आहे.
सदर झालेली घटना नकुल ठाकरे यांनी मोखाडा तालुक्यातील अनेक व्हाट्सअप ग्रुप वर शेअर केली असता अनेक लोकांनी ह्या झालेल्या प्रकाराबाबत खेद व्यक्त केला. असून नर्स जनतेला हेलपाटे मारायला लावून नाहक त्रास देत आहेत. अनेक रुग्णांसोबत हाॅस्पिटल मध्ये असे गैरवर्तनुकीची भाषाहोत असेल तर आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत.
झालेल्या घटनेबाबत विलास गिरधले वारली समाज मोखाडा तालुका अध्यक्ष यांनी आदिवासी वारली समाज उन्नती मंडळ पालघर तालुका मोखाडा कडून जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर प्रकाश निकम यांना व तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती मोखाडा यांना झालेल्या घटनेची चौकशी करून कार्यवाही करण्याचे पत्र दिले आहे.
त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा पालघर यांना कार्यवाही करण्याचे पत्र दिले. तसेच निलेश विनायक फुफाणे मनसे मोखाडा तालुका अध्यक्ष व दिलीप मोहंडकर शिवसेना तालुकाप्रमुख (उद्धव ठाकरे गट) मोखाडा यांनीही वैद्यकीय अधिकारी डॉ. महाले यांना झालेल्या घटनेची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी. असे सांगितले

Post a Comment