शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन


सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज 


 पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे पुणे जिल्ह्यातील समाजसेवक, व्यक्ती यांनी विविध पुरस्कारासाठी १५ ऑगस्ट पर्यंत परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

        सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सन २०१९-२०, २०२०२१, २०२१-२२, २०२२-२३ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्रावीण्य अशा विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

           सन २०१९-२०, २०२०-२१, व २०२१-२२ या वित्तीय वर्षाकरीता ज्या अर्जदारांनी किंवा संस्थेनी अर्ज केला आहे, त्यांनी पुरस्कारासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्जदारांनी ज्या वर्षाकरीता अर्ज केला आहे, त्या वर्षातील चारित्र्य पडताळणी अहवाल सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी ज्या वर्षासाठी व ज्या पुरस्काराकरीता अर्ज केला आहे, त्या वर्षातील विहित केलेल्या अटीची पूर्तता करणे आवश्यक राहील.

             विविध पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना  https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही समाज कल्याण विभागाचे आयुक्त आयुक्त ओम प्रकाश बकोरीया यांनी कळवले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post