सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : प्रत्येकी ५ लाखांचे बक्षीस असलेल्या राजस्थानमधील २ अतिरेक्यांना मंगळवारी (ता.१८) पकडले होते. या अतिरेक्यांना पकडणाऱ्या पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण व अमोल नाझण यांच्या जिगरबाज कामगिरीचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.
राजस्थानमधील २ अतिरेक्यांना पकडले. इम्रान खान आणि मो. युनूस साकी (दोघेही, रा. रतलाम, मध्य प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन हे मंगळवारी (ता.१८) गस्त घालत होते. यावेळी पोलिसांनी पहाटे पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ३ संशयित दुचाकी चोरांना पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची घरझडती करण्यासाठी नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्यातील एक जण पळून गेला. पोलिस पथकाने त्यांच्यापैकी दोघांना पकडले.
दरम्यान, आरोपी इम्रान खान, युनुस साकी हे राहत असलेल्या घराची झडती घेण्यात आली. घरातून एक काडतूस, चार मोबाइल संच, लॅपटॉप जप्त करण्यात आला. चौकशीत खान, साकी आणि साथीदाराविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने राजस्थानात गुन्हा दाखल केला होता हे उघड झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पसार झाले होते. एनआयएने त्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
पोलीस शिपाई चव्हाण, नाझण यांनी संशयित दहशतवादी खान आणि साकी यांना पकडले तेव्हा त्यांनी खोटी नावे सांगितली होती. पोलिसांनी दोघांचे मोबाइल क्रमांक विचारले. मोबाइल क्रमांकाची ॲपद्वारे पडताळणी करण्यात आली. तेव्हा आरोपींनी सांगितलेली नावे खोटी असल्याचे उघडकीस आले. पोलीस शिपाई चव्हाण आणि नाझण यांचा संशय बळावला. त्यांनी खान आणि साकी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर आरोपी राजस्थानातून पसार झाले असून, ते संशयित दहशतवादी असल्याचे उघडकीस आले.

Post a Comment