सुशीलकुमार अडागळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (बारामती) : वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत दि. १८/२/२०२३ ते दि. १९/२/२०२३ दरम्यान कृषी मुल शिक्षण संस्था काराटी येथील वाॅल कंम्पाउडचे बांधकामाचे स्टील मटेरीअल असा एकुण १,१०,१५० /- रूपये किमतीचे मटेरीअल अज्ञात चोरटयांनी चोरी केली अशा फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं ४७ / २०२३ भादवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
गुन्हयाचा तपास हा गोपणीय माहीती व तांत्रिक माहीतीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता आरोपी क्रमांक १) अक्तार जमीर शेख वय २८ वर्षे राह- यवलेवाडी, कमाण निंबाळकरवस्ती, ता. हवेली, जि. पुणे. मुळ राह- अंजलीनगर लातुर जि. लातुर २) लवकुश कुमार रैहीदास वय २२, राह - येवलेवाडी ता.हवेली जि. पुणे. मुळ राह- सुकरी ता. निवास जि. मंडला राज्य मध्यप्रदेश. ३) विजय नरसिंग साहु वय २३, सध्या राह - येवलेवाडी ता. हवेली जि. पुणे. मुळ राह- जंगनीया ता निवास जि. मंडला राज्य मध्यप्रदेश. ४) धमेंद्र रमेश चौधरी वय २७, सध्या राह— येवलेवाडी ता.हवेली जि. पुणे. मुळ राह- सहपुरा जि. डिडोरी राज्य मध्यप्रदेश. ५) राहुल गौतम बोरकर वय २७ सध्या राह- येवलेवाडी ता.हवेली जि. पुणे. मुळ राह- पातुर ता. पातुर जि. अकोला. ६) फिरोज फत्तेमोहम्मद खान वय ४२, सध्या राह- हडपसर, भेकराईनगर ता. हवेली जि. पुणे. यांनी सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन त्यांनी आणखी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुल दिली.
आरोपी नं. १ ते ६ यांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेले वाहन टाटा कंपनीचा इंन्ट्रा टेम्पो नं. एम.एच.१२ ए.एक्स ४४९३ हा ४,००,००० /- रूपये हा जप्त करण्यात आला असुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला एकुण २,००,९५० /- रू. किमतीचा मुद्दे माल असा एकुण ६,००,९५० /- रू आरोपीकडुन जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही अंकित गोयल पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, आनंद भोईटे अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, गणेश इंगळे उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस हवालदार राहुल भाग्यवंत, अनिल खेडकर, अनिल दणाणे, हिरामन खोमणे, हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, अमोल भुजबळ, होमगार्ड अक्षय बारवकर, पोलीस मित्र परेश भापकर यांनी केली.

Post a Comment