चांगदेव काळेल
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सातारा (कराड) : सातारा/उंडाळे परिसरातील वीस ते पंचवीस घरांची वस्ती असलेल्या सावंतवाडी येथे बऱयाच दिवसांपासून बिबट्याने या वाडीतच मुक्काम ठोकल्याची परिस्थिती आहे.
अद्यापही वन खात्याने या ठिकाणी कोणतीच उपाययोजना न केल्याने सावंतवाडी ग्रामस्थ संतप्त असून हिंस्र बिबट्याच्या भीतीच्या छायेखाली ग्रामस्थ वावरत आहेत. मात्र, वनविभाग ग्रामस्थांना नको ती कारणे देऊन बिबट्यासाठी सापळा लावण्यास टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत.
एक- दोन महिन्यांपासून बिबट्याची नर-मादी व तिची तीन पिल्ले सावंतवाडी, खुडेवाडी, मनव, साळशिरंबे, नांदगाव, ओंड, उंडाळे संगम यासह परिसरात सातत्याने खाद्याच्या शोधात भटकत असल्याचे शेतकऱ्यांच्या नजरेस पडत आहेत.
विशेष म्हणजे या बिबट्याने गेल्या अनेक दिवसापासून मनव येथील डांगे, दगडे वस्तीवर गत आठवड्यात दोन शेळ्या फस्त केल्या होत्या. याशिवाय डांगे वस्तीवर कोंबड्या, पाळीव कुत्री व भटकी कुत्री फस्त केली. काल रात्री सावंतवाडी मध्ये बिबट्याचा धुमाकुळ संजय करमळकर यांच्या शेडमधुन शेडनेट बांधलेले तोडुन बिबट्याने ४ महीन्याची रेडी फस्त केली. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सावंतवाडी ग्रामस्थ करत आहेत.

Post a Comment