चांगदेव काळेल
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सातारा : सातारा जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडण्यासाठी पोलीस विभागाने या कालावधीत चौक व कडेकोट बंदोबस्त ठेवावा, तसेच जे गुन्हेगार सतत गुन्हे करत आहेत, अशावर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधत्मक कारवाई करावी. असे निर्देश पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले
सातारा पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा पालकमंत्री देसाई यांनी येथील शिवतेज हॉल येथे घेतला यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पोलीस अधीक्षक समीर शेख सहाय्यक पोलीस अधीक्षक मीना यांच्यासह पोलिस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाही. यासाठी आत्तापासूनच बैठका घेण्यास सुरुवात करा अशा सूचना पालकमंत्री देसाई म्हणाले सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी सायबर सेल अत्याधुनिकी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल.
त्याचबरोबर सायबर सेल हाताळण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण द्यावे. जिल्हा वार्षिक योजनेमधून पोलीस दलाला नवीन वाहने दिले आहे. आणखी वाहनांची आवश्यकता असल्यास त्याचाही प्रस्ताव सादर करावा.
नवीन पोलीस स्टेशन, निवासस्थान इमारती बांधकामाचे प्रस्ताव द्यावेत त्यांचाही मंत्रालय स्तरावर पाठपुरवठा करून प्रश्न मार्गी लावले जातील. जिल्ह्याला मोठी परंपरा आहे. या परंपरेला साजेल असे काम करून जिल्ह्याचा नावलौकिक करा. पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर कामकाजावर समाधान व्यक्त करून पालकमंत्री देसाई यांनी पोलीस विभागाचे अभिनंदन केले.
तसेच बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक शेख यांनी संगणकीय सादरीकरण द्वारे पोलीस विभागाच्या कामकाजाची माहिती दिली.

Post a Comment