शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

सरकारी दवाखान्यात केसरी रेशनिंग कार्ड धारकांना बिलात मिळणारी सवलत बंद च्या विरोधात वंचित बहुजन आघाडीची आक्रमक



स्मिता बाबरे (मुख्य संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्यूज 


पुणे : वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर सचिव राजेंद्रजी साळवे यांचे नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत असणारे यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल संत तुकाराम नगर येथे सुरुवातीच्या काळात सर्व प्रकारचे रेशनिंग कार्ड धारकांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार घेतले.

       उपचारा वेळी जे काही वैद्यकीय बिल यायचे त्या वैद्यकीय बिला मध्ये सवलत अथवा पूर्ण बिल माफ होणे करिता केसरी रेशन कार्ड धारकांना पूर्ण बिल माफ केले जायचे परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने वैद्यकीय विभागात पूर्णता बदल केल्याने आता फक्त पिवळ्या कार्ड धारकांनाच वैद्यकीय बिलामध्ये सवलत मिळत आहे यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील केसरी रेशन कार्ड धारकांना आता वैद्यकीय बिलामध्ये सवलत मिळत नाही .

       सदरची बाब वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर सचिव राजेंद्रजी साळवे यांच्या  निदर्शनास आल्याने पिंपरी चिंचवड शहरातील केसरी कार्ड धारकांना सुद्धा पिवळ्या कार्डधारकाप्रमाणेच वैद्यकीय बिलामध्ये सवलत मिळाली पाहिजे व केसरी रेशन कार्ड धारकांचे कुठल्याही प्रकारचे हाल न होता त्यांना वैद्यकीय बिलात सवलत मिळणे कामे इतर राजकीय व्यक्तींकडे जास्त हेलपाटे मारावे लागता कामानये या करिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलचे वैद्यकीय अध्यक्ष राजेंद्र वाबळे यांना वंचित बहुजन आघाडी राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वाखाली एक निवेदन देण्यात आले. 

        निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले की पिवळ्या कार्डधारकाप्रमाणेच केसरी कार्ड धारकांना दवाखान्यात येणाऱ्या बिलामध्ये सवलत अथवा पूर्ण बिल माफ होणे करिता सहकार्य झाले पाहिजे.

                जोपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभाग असा जनसामान्याच्या हिताचा निर्णय घेत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी गप्प बसणार नाही व बेमुदत धरणे आंदोलनाच्या माध्यमातून महानगरपालिका वैद्यकीय विभागाला याविषयी निर्णय घेण्यास भाग पाडल्याशिवाय राहणार नाही 

              शिष्टमंडळामध्ये वंचित बहुजन आघाडी ज्येष्ठ कार्यकर्ते गोरख खळगे  पि.चि.शहर सचिव राजेंद्रजी साळवे प्रवीण कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post