शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा : छात्रसैनिकांची राष्ट्रध्वजास मानवंदना व शानदार संचलन


 

सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (हडपसर) जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ब्रिगेडियर रमाकांत खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले. महाविद्यालयाच्या गुणवत्तावाढी आढावा घेत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

             याप्रसंगी महाविद्यालयातील छात्रसैनिकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली तसेच शानदार संचलन करण्यात आले.

             ब्रिगेडियर रमाकांत खैरे यांनी महाविद्यालयातील छात्रसेनेतील विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगत देशाच्या उज्वल भवितव्यासाठी झटणाऱ्या छात्र सेनेच्या कॅडेसचे कौतुक केले. व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.



             या प्रसंगी जे.यु. ओ. सचिन कोकाटे (मुंबई पोलीस), कॅडेट दिव्या इंगळे (रेल्वे पोलीस), कॅडेट सचिन जांभूळकर, कॅडेट सागर कदम, कॅडेट शुभम बोटे यांचे उल्लेखनीय कामगिरी बद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. 

              दरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती गीत व गिटार वादन सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी काढलेल्या मनमोहक रांगोळीने लक्ष वेधून घेतले.

            याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे, कॅप्टन डॉ. धीरजकुमार देशमुख, प्रा. प्रीतम ओव्हाळ, कार्यालयीन अधीक्षक गणेश साबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रीतम ओव्हाळ यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post