शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

भिमाई आश्रमशाळेत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा ; कदम गुरुकुल व भिमाई आश्रमशाळेतर्फे रक्षाबंधन संपन्न.


 अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे  (इंदापूर) : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट अंकित प्राथमिक ,माध्यमिक, उच्चमाध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह व डॉ. कदम गुरुकुल इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात निसर्गाच्या सानिध्यात उत्साहपूर्ण, आनंदी वातावरणात राखी पौर्णिमा हा सण उत्साहात पार पडला.

          यावेळी भिमाई आश्रमशाळेच्या व डॉ. कदम गुरुकुलच्या विद्यार्थीनींनी मुलांना औक्षण करून राख्या बांधल्या.





           यावेळी कदम गुरुकुलच्या अध्यापक विद्या गायकवाड  यांनी डॉ.एल.एस.कदम, डॉ. सविता कदम व मुख्याध्यापिका वृंदा जोशी यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधन हा उत्सव आश्रमशाळेत साजरा केल्याचे सांगितले.



           यावेळी माध्य.व उच्च माध्य. आश्रमशाळेच्या उपप्राचार्या सविता गोफणे, प्राचार्या अनिता साळवे यांनी रक्षाबंधनाचे महत्व आपल्या मनोगतातून विशद केले.

         यावेळी डॉ. कदम गुरुकुलच्या अध्यापकांचा रोपटे भेट देऊन भिमाई आश्रमशाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

          यावेळी गुरुकुलचे सोमनाथ नलवडे, प्रताप कोरेकर तसेच आश्रमशाळेचे शिक्षक, प्राध्यापक, अधीक्षक, कर्मचारी आदी उपस्थित होते.

           यावेळी सूत्रसंचालन व प्रास्ताविक नानासाहेब सानप यांनी केले.तर आभार प्रा. जावेद शेख यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post